जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग, चीनची कबुली
तैवान (Taiwan) हा स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हे भारतात दाखवणारे नकाशे चीनकडून (China) जाळण्यात आले होते.
तैवान (Taiwan) हा स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हे भारतात दाखवणारे नकाशे चीनकडून (China) जाळण्यात आले होते. त्यानंतर आता चीनने आपली चुक कबुल केली असून जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची कबुली दिली आहे.
बीजिंग येथील बेल्ट अॅंन्ड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असताना चीनने त्यावेळी बीआरआय मार्गांचे नकाषे दाखवले. त्या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दाखवण्यात आले.(भारतात अरुणाचल प्रदेश दाखवणारे नकाशे चीन देशाकडून नष्ट)
प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी नकाशे नष्ट करण्यात आले असल्याचे चीनकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. अनहुई प्रांतामधील एका चीनी कंपनीने हे इंग्रजीमधील नकाशे बनवले होते. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता. मात्र दक्षिण तिबेटचा हिस्सा म्हणून अरुणाचल प्रदेश असल्याचे चीनचे म्हणणे होते.