कोरोना विषाणू रोखण्यासाठी चीन 10 दिवसांत उभारणार 1 हजार बेडचं नवीन रुग्णालय
या व्हायरसने आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. 23 जानेवारी म्हणजेच गुरुवारपासून या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे येत्या 3 फेब्रुवारीला या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. या रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे.
चीनमध्ये वुहान शहरात कोरोना व्हायरस (Coronavirus) लागण झपाट्याने होत आहे. या व्हायरसने आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवीन रुग्णालय (New Hospital) उभारण्यात येणार आहे. 23 जानेवारी म्हणजेच गुरुवारपासून या रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे येत्या 3 फेब्रुवारीला या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. या रुग्णालयामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे.
मुंबई शहरात आज दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले आहेत. याबाबत मुंबई महानगर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत. जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. मात्र सध्या चीनमध्ये कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चीनने रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी युद्ध पातळीवर रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले आहे. (हेही वाचा - Coronavirus याची चीन मध्ये झपाट्याने वाढत चालल्याने आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू)
या भव्य रुग्णालयाच्या बांधकामासाठी वुहान शहरामधील रस्ते, मॉल आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद केली जात आहेत. तसेच रुग्णालयाचे बांधकाम लवकरात-लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री जमा करण्यात आली आहे. कामगार तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने सहा दिवसांमध्ये रुग्णालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा आणि डॉक्टर्संची नियुक्ती करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असून 830 रुग्ण या व्हायरसने बाधीत असून आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.