China Coronavirus Vaccine: चीनने जगाला दाखवली आपल्या पहिल्या कोरोना व्हायरस लसीची झलक; जाणून घ्या या लसीच्या चाचणीचे तपशील

चीनच्या (China) वूहान शहरामधून कोरोना विषाणू (Coronavirus) इतरत्र पसरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळू हळू हा विषाणू संपूर्ण जगभर पसरला. अजूनही या विषाणूचा कहर चालूच आहे. अनेक देश या विषाणूवर ठोस लस (Vaccine) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत,

Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

चीनच्या (China) वूहान शहरामधून कोरोना विषाणू (Coronavirus) इतरत्र पसरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर हळू हळू हा विषाणू संपूर्ण जगभर पसरला. अजूनही या विषाणूचा कहर चालूच आहे. अनेक देश या विषाणूवर ठोस लस (Vaccine) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशात चीनच्या कोरोना विषाणू लसची पहिली झलक सोमवारी बीजिंग ट्रेड फेयरमध्ये दिसून आली. यावेळी दोन लसी ठेवण्यात आल्या होत्या. पहिली लस ‘कोरोनावॅक' (CoronaVac) ही चिनी कंपनी सिनोवॅक बायोटेकने (Sinovac Biotech) तयार केली आहे. ट्रेड फेयरमध्ये ही लस इंजेक्शनच्या स्वरुपात दिसून आली. .

कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की ही लस तयार करण्यासाठी फॅक्टरी उभारली जात आहे. त्याद्वारे एका वर्षात 300 दशलक्ष लस तयार केली जाईल. सिनोवॅक बायोटेकचे मुख्य कार्यकारी यिन म्हणतात की, कंपनीतील 90 टक्के कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना ही लस देण्यात आली आहे. आपत्कालीन कार्यक्रमांतर्गत त्यांना ही देण्यात आली आहे. याची सुरुवात जुलैमध्ये झाली होती व अजूनही याची ट्रायल चालू आहे. कोरोनावॅक घेतल्यानंतर आढळलेल्या दुष्परिणामांमध्ये थकवा, ताप आणि वेदना यांचा समावेश आहे, ज्यामध्ये बहुतेक सौम्य लक्षणे आहेत.

दुसरी चीनी औषध कंपनी सिनोफार्मनेही (Sinopharm) आपली लस आणली आहे. सिनोफार्मच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, लसीच्या दोन डोसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. दोन्ही चीनी लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. उल्लेखनीय म्हणजे, अजूनतरी कोणतीही कोरोना व्हायरस लस बाजारात दाखल झालेली नाही आणि उत्पादकांना या वर्षाच्या अखेरीस आवश्यक त्या सर्व मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Coronavirus Vaccine Latest Update: कोविड-19 वरील लस 2021 वर्षाच्या मध्यापर्यंत उपलब्ध होणार नसल्याची WHO च्या प्रवक्त्यांची माहिती- Reuters रिपोर्ट्स)

दरम्यान, रशियाने कोविड-19 विरूद्ध लसीच्या पहिल्या तुकडीचे उत्पादन सुरू केले आहे. कोरोना व्हायरस विरुद्ध जगातील पहिल्या नोंदवलेल्या लसची घोषणा गेल्या महिन्यात राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन केली होती. मात्र, कोरोनापासून बचावासाठी आपली लास प्रभावी आणि पुरेशी सुरक्षित आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही देशाने मोठ्या प्रमाणात तीन टप्प्यातील चाचण्या अजूनतरी केल्या नाहीत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

AUS W vs ENG W Only Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाने केल्या 422 धावा, अ‍ॅनाबेल सदरलँड आणि बेथ मूनी यांनी शानदार खेळी; दुसऱ्या दिवसाचा स्कोअरकार्ड येथे पहा

Sri Lanka vs Australia, 1st Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेने पाच विकेट गमावून केल्या 136 धावा; दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिसकडून उद्या मोठ्या खेळीची अपेक्षा

AUS W vs ENG W Only Test 2025 Live Streaming: एकमेव कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार जोरदार लढत, थोड्याच वेळात सुरु होणार सामना; कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून

AUS vs SL 1st Test 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिला दिवस कांगारुच्या नावावर, ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावून केल्या 330 धावा, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथचे शानदार शतक

Share Now