Donald Trump यांनी अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाची घेतली शपथ; J D Vance हे US Vice President म्हणून शपथबद्ध (Watch Video)
अमेरिकेला संबोधताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे असं म्हटलं आहे. आता अमेरिकेची अधोगती संपणार आहे असेही ते म्हणाले आहेत.
अमेरिकेमध्ये आज Donald Trump यांचा अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ पार पडली आहे. त्यांच्यासोबतच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून J D Vance चा शपथविधी देखील पार पडला आहे. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स (Chief Justice John Roberts) यांनी त्यांना शपथ दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची शपथ पार पडताच त्यांना गन सेल्युट देण्यात आली. या वेळी अमेरिकेला संबोधताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे असं म्हटलं आहे. आता अमेरिकेची अधोगती संपणार आहे असेही ते म्हणाले आहेत.
अमेरिकेच्या माजी राष्ट्रध्यक्षांसोबत आज डोनाल्ड ट्र्म्प यांच्या शपथविधीला Tesla and SpaceX CEO Elon Musk, Amazon co-founder Jeff Bezos, आणि Meta CEO Mark Zuckerberg यांनीही हजेरी लावली होती. 40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच यूएस राष्ट्राध्यक्ष पदाच्या हा शपथविधी सोहळा यूएस कॅपिटलमध्ये बाहेर न होता आतमध्ये आयोजित केला आहे. थंडीची परिस्थिती लक्षात घेऊन हा सोहळा आतमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्र्म्प यांचा शपथविधी
जे डी व्हेन्स यांचा शपथविधी
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- अमेरिकेत आता केवळ महिला आणि पुरूष हे दोनचं लिंग असणार, ट्रान्सजेंडर/ थर्ड जेंडर नसेल.
- अमेरिकेत फ्रीडम ऑफ स्पीच असेल.
- ड्रग्स तस्कर आता दहशतवादी म्हणून घोषित होणार
- अमेरिकेचे जवान दुसर्यांच्या लढाईत आता जाणार नाहीत.
- मेक्सिको बॉर्डर वर इमरजंसी जाहीर
- दक्षिणी सीमांवरही इमरजंसी जाहीर
- दुसर्या देशांसाठी टॅक्स आणि टॅरिफ वाढवणार
दरम्यान भारताकडून या सोहळ्याला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उपस्थिती लावली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्र्म्प यांच्यासाठीचे एक खास पत्र घेऊन पोहचले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)