Canada Lifts Ban: कॅनडा येथून भारतात येणाऱ्या पॅसेंजर विमाना प्रवासावरील हटवले निर्बंध

कोविड19 च्या प्रोटोकॉल अंतर्गत गेल्या काही काळापूर्वी निर्बंध लागू केले होते.

Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

Canada Lifts Ban:  कॅनडा सरकारने एक मोठा निर्णय घेत भारतात येणाऱ्या पॅसेंजर विमान सेवेवरील निर्बंध हटवले आहेत. कोविड19 च्या प्रोटोकॉल अंतर्गत गेल्या काही काळापूर्वी निर्बंध लागू केले होते. मात्र आता जस्टिन टूडो यांच्या सरकारने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कॅनडाने भारतात येणाऱ्या सर्व कमिर्शियल आणि प्रायव्हेट पॅसेंजर फ्लाइट्सवरील बंदी 26 सप्टेंबर पर्यंत वाढवली होती. परंतु नागरिकांना भारतातून कॅनडासाठी प्रवास करता येणार आहे.

नागरिकांना कोविड19 च्या नियमांचे पालन करावे लागणार आहेत. तर नागरिकांचे कोविड19 चे रिपोर्ट्स निगेटिव्ह असावेत. अधिकाऱ्यांच्या मते, एअर कॅनडा भारतासाठीची आपली फ्लाइट्स उद्यापासून पुन्हा सुरु शकते. तर एअर इंडिया कॅनडासाठी आपली फ्लाइट्स 30 सप्टेंबरला पुन्हा सुरु करणार आहे.(Air Pollution: जगात वायू प्रदूषणाचा धोका वाढला; वर्षाला होत आहे तब्बल 70 लाख लोकांचा मृत्यू- WHO)

बुधवारी भारतातून येणाऱ्या तीन प्रवासी उड्डाणांवर प्रवाशांची चाचणी केल्यानंतर कॅनडाने ही प्रवास बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ अधिकाऱ्यांच्या तपासात, या फ्लाइटमध्ये आलेल्या सर्व प्रवाशांचा कोविड -19 चाचणी नकारात्मक आली होती.

तर विमान प्रवास करणाऱ्यांना दिल्ली विमानतळावर कोविड19 चे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणे अनिवार्य असणार आहे. तर प्रवासापूर्वीच्या 18 तासांचे रिपोर्ट्स असावे. बोर्डिंग पूर्वी एअर ऑपरेटर पॅसेंजर्सची चाचणी करणार असून ते कॅनडासाठी प्रवास करु शकतात की नाही हे सांगणार आहेत. लसीकरण झालेल्या प्रवासी नागरिकांना त्यासंबंधित माहिती ArriveCAN च्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर अपलोड करावी लागणार आहे. अधिकाऱ्यांकडून तुमच्या लसीकरणाबद्दल वेरिफिकेशन केले जाणार आहे. असे न झाल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही आहे.