Cabbage & Broccoli: काय सांगता? शेतातून चक्क कोबी आणि ब्रोकोली तोडण्यासाठी दिला जात आहे 63 लाख रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

या नोकरीसाठी दोन जाहिराती ऑनलाईन प्रकाशित करण्यात आल्या आहेत. एका जाहिरातीत म्हटले आहे की, कंपनी कोबी तोडण्यासाठी फील्ड ऑपरेटर शोधत आहे.

Cabbage & Broccoli (संग्रहित संपादित प्रतिमा)

जीवनात प्रत्येकालाच भरपूर पैसे कमवायचे असतात. बऱ्याच वेळा जास्त पैशांसाठी लोक आपली आवडली फिल्डही सोडायला तयार होतात. जर तुम्हाला सांगितले की तुम्हाला भाजीपाला तोडण्यासाठी वार्षिक 63 लाख रुपये दिले जातील, तर तुम्ही काय कराल? बरेच जण ताबडतोब ही ऑफर स्वीकार करतील. तर ही नोकरीची ऑफर यूकेच्या (UK) एका शेतकी कंपनीने दिली आहे. यासाठी त्यांनी एक ऑनलाईन जाहिरात जारी केली आहे. यूके फार्मिंग कंपनी T H Clements & Son Ltd ने ही जाहिरात दिली असून, त्यामध्ये म्हटले आहे की, हे वर्षभर शेतातून कोबी आणि ब्रोकोली (Cabbage & Broccoli) काढण्याचे काम आहे.

करोना काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगारीमुळे लोक अजूनही चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात इकडे-तिकडे भटकत आहेत. अशा परिस्थितीत, युकेची एक कंपनी शेतातून कोबी आणि ब्रोकोली तोडण्यासाठी 63 लाख रुपये देत आहे. एवढेच नाही तर ओव्हरटाइमचे पैसे वेगळे दिले जातील. शेतातून कोबी आणि ब्रोकोली काढण्याचे हे वर्षभाराचे काम आहे. यामध्ये, निवडलेल्या कर्मचाऱ्याला दररोज 30 पौंड म्हणजे प्रति तास 3 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळेल. जाहिरातीनुसार, कर्मचाऱ्याचे वार्षिक पॅकेज 62 हजार 400 पौंड (भारतीय चलनात 63 लाख 20 हजारांहून अधिक) असेल. (हेही वाचा: UAE First Hindu Temple: अबू धाबी येथे उभारले जात आहे पहिले हिंदू मंदिर; 1000 वर्षे टिकेल, जाणून घ्या वैशिष्ठ्ये)

कंपनीच्या जाहिरातीत असेही लिहिले आहे की हे परिश्रमाचे काम आहे व ते वर्षभर करावे लागेल. या नोकरीसाठी दोन जाहिराती ऑनलाईन प्रकाशित करण्यात आल्या आहेत. एका जाहिरातीत म्हटले आहे की, कंपनी कोबी तोडण्यासाठी फील्ड ऑपरेटर शोधत आहे. या नोकरीद्वारे तुम्ही प्रति तास 3000 रुपयांपर्यंत सहज कमावू शकता. परंतु जर तुम्हाला अधिक कमवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्यादा काम करावे लागेल. तुम्ही जेवढे जास्त काम कराल तेवढे जास्त पैसे तुम्ही कामवाल.

दरम्यान, सध्या यूके मध्ये शेतात काम करणारे कामगार आणि मजुरांची मोठी कमतरता आहे. यामुळे, तेथील सरकार हंगामी कृषी कामगार योजनेअंतर्गत कामगारांना जास्त पैशात काम करण्याची संधी देत आहे. येथे केवळ शेतीच नाही तर इतर अनेक क्षेत्रात कामगारांची कमतरता आहे. म्हणूनच आजकाल यूकेमध्ये कामगारांची मागणी वाढली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी कंपन्या प्रचंड पगार देण्यासही तयार आहेत. यूकेमधील कामगारांच्या वेतनात 75 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे.