Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 120 भारतीयांना घेऊन C-17 विमान काबुलहून रवाना, भारतात पुन्हा प्रवेशासाठी सरकारकडून फास्ट ट्रॅक व्हिसाची सेवा सुरू

या विमानात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 120 भारतीय उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोमवारी हेल्पलाईन क्रमांक 919717785379 जारी केला आहे. तसेच MEAHelpdeskIndia@gmail.com या ईमेल पत्त्याची घोषणा केली आहे.

Indian C-17 Aircraft

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी तालिबान्यांनी (Taliban) ताब्यात घेतल्यानंतर तेथील झपाट्याने बिघडत चाललेली परिस्थिती पाहता अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सुमारे 200 भारतीयांना (Indian) सुरक्षितपणे परत आणण्याचे सरकारचे (India Government) प्रयत्न चालले होते. यामध्ये भारतीय दूतावासातील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MFA) सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून काबूलमधील (Kabul) सुरक्षा परिस्थिती अधिकच बिघडली आहे. दरम्यान भारताचे C-17 विमान अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथून उड्डाण केले आहे. या विमानात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 120 भारतीय उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावास अद्याप बंद झालेले नाही. भारतीय दूतावासात उपस्थित असलेल्या मुत्सद्यांची सुरक्षा इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या सशस्त्र दलाच्या तुकडीकडे सोपवण्यात आली आहे आणि ते आवश्यक तेवढ्या काळासाठी तिथेच राहतील.

भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर परिवहन विमान गेल्या दोन दिवसांपासून तयार ठेवण्यात आले होते. मात्र बिघडलेली परिस्थिती पाहता भारतीय दूतावास आणि इतर ठिकाणांहून भारतीयांना विमानतळावर आणण्याबाबत चिंता निर्माण होती.  अधिकाऱ्यांनी सांगितले की भारत विविध विकास प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व अफगाण नागरिकांना व्हिसा जारी करेल. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. ज्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे, त्यांच्या परत येण्याची सोय करू. ते म्हणाले की परस्पर विकास, शैक्षणिक आणि लोकांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताचे सहयोगी असलेले अनेक अफगाणी आहेत आणि भारत त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे भारत सरकारने सांगितले आहे. हेही वाचा  अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोडले मौन; सैन्य माघारीवर ठाम

काल संध्याकाळी उशिरा कर्मचाऱ्यांना विमानतळाच्या भागात सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अफगाणिस्तानमधील अनेक भारतीय ज्यांना भारतात परत यायचे आहे ते सुरक्षित भागात आहेत. तसेच त्यांना एक -दोन दिवसात भारतात परत आणले जाईल. तेथील भारतीयांना पुन्हा प्रवेशासाठी फास्ट ट्रॅक व्हिसा अर्जांसाठी ई-आपत्कालीन पूर्व-विविध व्हिसा नावाची इलेक्ट्रॉनिक व्हिसाची नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) म्हटले आहे की, भारत सरकार तेथील बारकाईने नजर ठेवून आहे. MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोमवारी हेल्पलाईन क्रमांक 919717785379 जारी केला आहे. तसेच  MEAHelpdeskIndia@gmail.com या ईमेल पत्त्याची घोषणा केली आहे.

दरम्यान हे सर्व सुरू असतानाचे अफगाणिस्थानाला अजून एक धक्का बसला आहे.  अफगाणिस्तानमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या मते, या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 83 किमी दक्षिण -पूर्व मध्ये होते. आज सकाळी 6:08 वाजता आलेल्या या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केलवर मोजण्यात आली आहे. मात्र, भूकंपादरम्यान जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत कोणतीही माहिती नाही. स्थानिक संस्था या संदर्भात माहिती गोळा करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif