UNICEF on Climate Change: 2050 पर्यंत, मुलांना 2000 च्या तुलनेत 8 पट अधिक उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार - युनिसेफ

त्यामुळे तरूणांना अत्यंत उष्ण हावामानाला सामोरे जावे लागेल.

Photo Credit- X

UNICEF on Climate Change: वाढत्या आधुनिकतेत हवामान धोकादायक बदल होत आहेत. या शतकाच्या मध्यात तरुणांसाठीचे वातावरण अत्यंत खडतर(Climate Change) होणार आहे. असा इशारा युनिसेफने व्यक्त केला आहे. मुलांसाठीच्या संयुक्त राष्ट्र संस्थेने मंगळवारी एका वार्षिक अहवालात दिला. सध्या मुलांना हवामानाच्या धक्क्यांपासून (Heatwaves)ते ऑनलाइन फसवेगिरीपर्यंत असंख्य संकटांचा सामोरे जावे लागत आहे. येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होणार आहे. युनिसेफच्या (UNICEF) कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांनी एजन्सीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करताना अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

अहवात जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या दशकाची प्रगती, विशेषतः मुलांसाठी धोकादायक आहे. यावर्षी, युनिसेफने आपल्या अहवालाचा उपयोग 2050 पर्यंत पुढे नेण्यासाठी तीन "मुख्य ट्रेंड" ओळखण्यासाठी केला आहे. ज्यामध्ये धोरणात्मक बदल न केल्यास तरूणांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. (UNICEF Report: जगभरात 40 कोटी मुलांना शिस्तीचे धडे घेताना घरात हिंसेचा सामना करावा लागतो; युनिसेफच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर)

पहिला धोका म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय बदल, मुलांची संख्या सध्या 2.3 अब्ज आहे. परंतु 2050 ती घटन्याची शक्यता आहे. तरुणांची संख्या १० अब्ज वृद्धांच्या तुलनेत फार कमी असेल. त्यांचा जागतिक लोकसंख्येतील वाटा फार लहान आहे. मात्र, सर्व प्रदेशांमध्ये मुलांचे प्रमाण कमी होत असताना, त्यांची संख्या काही गरीब भागात, विशेषत: आफ्रिकेत वाढेल. त्यामुळे त्या काळात काही विकसित देशांमध्ये, 2050 पर्यंत मुले लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असू शकतात. त्यामुळे, वृद्ध लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समाजातील अधिकारांबद्दल चिंता निर्माण होते.

दुसरा धोका हवामान बदल

जर सध्याचा हरितगृह वायू उत्सर्जनाचा ट्रेंड चालू राहिला तर 2050 पर्यंत मुलांना 2000 च्या तुलनेत आठपट जास्त उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, तिप्पट जास्त तीव्र पर्माणात पूर येऊ शकतो. 1.7 पट अधिक जंगलात आग लागण्याच्या घटना घडू शकतात. नवीन तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन नवकल्पना आणि प्रगतीला सामर्थ्यवान बनवण्याची क्षमता आहे परंतु श्रीमंत आणि गरीब देशांमधील विद्यमान असमानता देखील वाढवू शकते. वीज, कनेक्टिव्हिटी किंवा उपकरणांच्या कमतरतेमुळे, अल्प विकसित देशांतील फक्त 26 टक्के लोकांच्या तुलनेत, विकसित राष्ट्रांमधील अंदाजे 95 टक्के लोकांकडे इंटरनेटचा वापर असेल.

युनिसेफच्या म्हणण्यानुसार, गरीब घरांमधील मुले अडथळे दूर करण्यात अयशस्वी होऊ शकतात. म्हणजे आधीच वंचित असलेली पिढी आणखी मागे पडू शकते. नवीन तंत्रज्ञानाच्या अनियंत्रित प्रसारामुळे मुलांना आणि त्यांच्या वैयक्तिक डेटाला धोका निर्माण होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif