भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa रंगली तिरंगी रंगात (Photos)

73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईतील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) तिरंगाच्या रंगात रंगली होती. आज रात्री साधारण 8.44 वाजता बुर्ज खलिफावर केशरी, पांढरा आणि हिरवा रंग चढलेले दिसले.

बुर्ज खलीफावर तिरंगा (Photo Credit : Twitter)

15 ऑगस्ट, भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (73rd Independence Day) दुबईमध्येही (Dubai) तिरंगा (Tri colour) झळकलेला दिसला. 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईतील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa) तिरंगाच्या रंगात रंगली होती. आज रात्री साधारण 8.44 वाजता बुर्ज खलिफावर केशरी, पांढरा आणि हिरवा रंग चढलेले दिसले. काही तांत्रिक कारणामुळे काल ही घटना पार पडू शकली नाही. मात्र आज न चुकता दुबईनेही भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला. जगातील सर्वात उंच (World Tallest Building) इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर महत्त्वपूर्ण प्रसंगी मित्र देशांचे राष्ट्रध्वज सादर केले जातात.

या टॉवरवर यापूर्वीही अनेक वेळा भारताचा झेंडा सादर करण्यात आला आहे. आज भारतासोबत पाकिस्तानी ध्वजही बुर्ज खलिफावर झळकताना दिसला. पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन 14 ऑगस्ट रोजी होता. ऑल इंडिया रेडिओ न्यूजने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे, सोबत बुर्ज खलिफावरील तिरंग्याचेही फोटोज शेअर करण्यात आले आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी स्वतंत्र देशाची नवी पहाट पहिली होती. हा दिवस इतका सोप्या रीतीने अनुभवायला मिळाला नव्हता. यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा कुठे  भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. म्हणूनच काल आपण 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करू शकलो. याबाबत भारताला शुभेच्छा देण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंगामध्ये दिसून आला.