दुबई: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर Burj Khalifa वर करण्यात आलेल्या अद्भूत रोषणाईच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला घरी राहण्याचा सल्ला
या इमारतीवर केलेल्या रोषणाईच्या माध्यमातून नागरिकांना 'Stay Home'असा संदेश देण्यात आला आहे.
संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विषाणूच्या जाळ्यात अडकले असल्याने शासकीय यंत्रणेसोबत सर्व कलाकार, दिग्गज नेते नागरिकांना खबरदारी घेण्याचे संदेश देत आहेत. सध्या कोरोना संदर्भात आपल्यासाठी कठीण काळ सुरु झाला असून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आणि जागरुक राहणे गरजेचे आहे असे शासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफा (Burj Khalifa)यानेही या सामाजिक कार्यात सहभागी झाली आहे. या इमारतीने आपल्या रोषणाईच्या माध्यमातून जनतेला कोरोना चा प्रार्दुभाव टाळण्यासाठी महत्वपूर्ण संदेश दिला आहे.
उच्चभ्रू लोक राहत असलेले जगातील प्रसिद्ध असलेली दुबईतील बुर्ज खलिफा वर कोरोना व्हायरसचा संदेश देण्यासाठी अद्भूत रोषणाई करण्यात आली आहे. या इमारतीवर केलेल्या रोषणाईच्या माध्यमातून नागरिकांना 'Stay Home'असा संदेश देण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ:
जगभरातील लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश असून लोकांनी त्याचे पालन करावे हा यामागचा उद्देश आहे. सद्य स्थितीत जगभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3,79,000 वर जाऊन पोहोचला आहे.त्यात 15000 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर भारतात हा रुग्णांचा आकडा हा 471 वर जाऊन पोहोचला महाराष्ट्रात या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. ही स्थिती खूपच चिंताजनक असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व डॉक्टर्स, तज्ज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.