British Airways Flight Attendant चा विमानाच्या टेक ऑफ पूर्वी काही क्षण आधी जमिनीवर कोसळून मृत्यू

मागील काही आठवड्यात अशाप्रकारे मृत्यू झालेली ही दुसरी British Airways flight attendant आहे.

Flight | (PC- Pixabay.com)

ब्रिटीश एअरवेज (British Airways) मध्ये प्रवाशांसमोरच फ्लाईट अटेंडंट (Flight Attendant) कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पुरूष फ्लाईट अटेंडंंटचा मृत्यू देखील झाला आहे. तो  52 वर्षीय  होता. हे विमान लंडनच्या Heathrow Airport वरून हॉंगकॉंग ला निघाले होते. ही घटना New Year's Eve ची आहे. या फ्लाईट अटेंडंटची ओळख समोर आलेली नाही. पॅसेंजर सारे विमानात बसल्यानंतर दरवाजे बंद झाले होते.  प्रवाशांनी बेल्ट लावले होते अशातच ही घटना टेक ऑफच्या काही क्षण आधी घडली.  पायलटने यानंतर तातडीने Medical Assistance मागितला मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. प्रथमोपचाराची माहिती असलेल्या एका प्रवाशाने देखील मदत केली होती.

London Ambulance Service कडून ट्वीट करून या घटनेची माहिती देण्यात आली आहे. The Sun च्या माहितीनुसार, मृत क्रू मेंबरला कोणताही आजार नव्हता. पण याव्यतिरिक्त अन्य माहिती मिळू शकलेली नाही. विमानाचं उड्डाण रद्द करून विमान दुसर्‍या दिवसासाठि रिशेड्युल करण्यात आलं. दुसर्‍या दिवशी पायलट आणि क्रू मेंबर्सची नवी टीम विमान घेऊन निघाली. Airplane window blows out Mid-Air: विमानाची खिडकी हवेतच उघडली, काय घडले पुढे? (Watch Video) .

मागील काही आठवड्यात अशाप्रकारे मृत्यू झालेली ही दुसरी British Airways flight attendant आहे. अशी माहिती Fox News ने दिली आहे. 23 डिसेंबर दिवशी फ्लाइट दरम्यान, 52 वर्षीय क्रू मेंबरचा मृतदेह त्याच्या हॉटेलच्या खोलीत सापडला. परिणामी, Newark हून लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले.