विकृत नवऱ्याच्या सुखाची तृप्ती करण्यासाठी क्रूर आईने 4 महिन्यांच्या बाळाची 28 हाडे तोडली
पाठीमागील चार ते सहा आठवड्यांपासून बालकाला मारहाण केली जात होती. त्याच्या शरीरातील 28 हाडेही या मारहाणीत तुटली होती. एलेक्सेंड्रा कोपिनस्का आणि अॅडम जेनडर्जेक हे दोघे पती-पत्नी असून, दोघेही बेरोजगार होते.
नवऱ्याच्या विकृत सुखाची तृप्ती करण्यासाठी एका क्रूर आईने आपल्या चार महिन्यांच्या बालकाला वेदनेच्या भायान महापूरात ढकलले. बालकाच्या रडण्याने नवरा खूश होतो म्हणून आई नावाच्या या क्रूर स्त्रीने त्या बाळाच्या शरीराची 28 हाडे तोडून टाकली. सुसंस्कृत लोकांचा देश अशी जगभरात ओळख असलेल्या इंग्लंडमधील एसेक्स शहरातील ही घटना. या प्रकरणात एलेक्सेंड्रा कोपिनस्का (Aleksandra Kopinska) आणि एडम जेनडर्जेक (Adam Jendrzeczak ) या जोडप्याला 8 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित बालकाला ब्रायटन (Brighton) येथील रॉयल सक्सेस बाल रुग्णालयात (Royal Sussex County Hospita) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार करत असताना मुलाचा डावा हात फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांच्या ध्यानात आले. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या आदेशाने पीडित बालकाच्या शरीराचा एक्सरे काढला. एक्सरे पाहताच डॉक्टरांना धक्काच बसला. बालकाच्या डाव्या हाताला एकदोन नव्हे तर, तब्बल 28 ठिकाणी फ्रॅक्चर होते. तसेच, बालकाच्या बरगड्या, गुडघा आणि शरीराच्या इतर ठिकाणीही अनेक फ्रॅक्चर होते. संशय आल्याने डॉक्टरांनी त्याच्या आईवडीलांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. (हेही वाचा, धक्कादायक : पत्नी समजून मुलीसोबत केला सेक्स; आरोपी पित्याला मिळाली अडीच वर्षांची शिक्षा)
पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक सत्य पुढे आले. पाठीमागील चार ते सहा आठवड्यांपासून बालकाला मारहाण केली जात होती. त्याच्या शरीरातील 28 हाडेही या मारहाणीत तुटली होती. एलेक्सेंड्रा कोपिनस्का आणि अॅडम जेनडर्जेक हे दोघे पती-पत्नी असून, दोघेही बेरोजगार होते. दोघांनी मिळून या बालकाला जन्म दिला. इतके भयानक कृत्य का केले याचे कारण विचारले असता दोघांनाही उत्तर देता आले नाही. पण, न्यायाधीशांनी आपल्या आयुष्यातील सर्वात भयंकर घटना असे मत नोंदवत दोघांना 8 वर्षांची कठोर शिक्षा ठोठावली. पीडित मुलावर बालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.