Britain PM: बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर, दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटेनचे नवे पंतप्रधान?

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची मोठी चर्चा होत आहे. कारण ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आता या पंतप्रधान पदाच्या शर्यतेतून बाहेर पडले आहेत.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या (Conservative Party) नेत्या लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. तरी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कोण होणार पंतप्रधान अशी लढत सुरु झाली आहे. लिझ ट्रस (Liz Truss) सर्वात कमी कार्यकाळ असणाऱ्या पंतप्रधान ठरल्या आहेत. सध्या त्या ब्रिटनच्या काळजीवाहू पंतप्रधान असल्या तरी आज ब्रिटेनचा (Britain) नवा पंतप्रधान कोण ह्याचा फैसला होणार आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पुन्हा एकदा भारतीय वंशाचे  ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या नावाची मोठी चर्चा होत आहे. कारण ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आता या पंतप्रधान पदाच्या शर्यतेतून बाहेर पडले आहेत. तरी आता ब्रिटेनचे पुढील पंतप्रधान ऋषी सुनकचं होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 ऑक्टोबर म्हणजे आज ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

ब्रिटेनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या विरोधात पेनी मॉर्डॉंट पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे. पेनी मॉर्डॉन्ट (Penny Mordaunt) यांना सध्या 29 खासदारांचा पाठिंबा आहे. पण पंतप्रधान पदासाठी पेनी मॉर्डॉन्ट यांना आणखी 100 खासदारांचा पाठींबा असणं अनिवार्य आहे. तरी ऋषी सुनक यांना एकूण 142 सदस्यांचा पाठिंबा आहे म्हणजेचं पेनी मॉर्डॉंट यांना आज दुपारी 2 वाजता पर्यत 100 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यास अयशस्वी झाल्यास ऋषी सुनक आपोआपचं ब्रिटेनचे नवे पंतप्रधान होतील. (हे ही वाचा:- Rishi Sunak : कोण होणार ब्रिटेनचे नवे पंतप्रधान? पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी चर्चा)

 

आज ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.  तरी ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी काल आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच अर्थव्यवस्था सुधारणे, पक्ष एकत्र करणे आणि "देशासाठी उद्धार" हे सुनक यांचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं. तरी दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यास ब्रिटेनसह भारतीयांसाठी देखील ही आनंदाची बातमी असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement