2019 मधील सर्वात मोठी डेटा चोरी, 3 कोटी लोकांच्या क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती लीक; होत आहे ऑनलाइन विक्री

आपण पेट्रोल भरताना, फूड, ऑनलाइन शॉपिंगवेळी डेबिट-क्रेडिड कार्डचा वापर करतो. अशावेळी ही माहिती कंपनीकडे जाते

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

क्रेडिट-डेबिट कार्ड (Credit-Debit Card) वापरणार्‍या लोकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जगभरात तीन कोटी कार्ड्स माहिती लीक झाली आहे. जगातील सर्वात मोठी फ्रॉड इंटेलिजन्स कंपनी, जेमिनी अ‍ॅडव्हायझरी (Gemini Advisory) या कंपनीने मंगळवारी एक अहवाल जाहीर केला असून, त्यात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की 2019 मध्ये सर्वात मोठी डेटा चोरी झाली आहे.

सुमारे 850 स्टोअर आणि 3 कोटी लोकांचे पेमेंट रेकॉर्ड चोरीला गेले आहेत. न्यूज 18 वेब पोर्टलनुसार, आपण पेट्रोल भरताना, फूड, ऑनलाइन शॉपिंगवेळी डेबिट-क्रेडिड कार्डचा वापर करतो. अशावेळी ही माहिती कंपनीकडे जाते.

अशाप्रकारे सुमारे 850 स्टोअर आणि 30 दशलक्ष लोकांचे देयक रेकॉर्ड चोरीला गेले आहेत. गेल्या वर्षीची ही सर्वात मोठी डेटा चोरीची घटना आहे. Wa Wa ही एक अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीचे अमेरिकेसह जगभरात किरकोळ स्टोअर्स आणि गॅस स्टेशन आहेत. तसेच, कंपनी फूड स्टोअर्स देखील चालवते. Wa Wa मध्ये वापरलेल्या कार्ड डेटापैकी बराच डेटा अमेरिकन वित्तीय संस्थांचे आहेत. हे सर्व जोकर स्टॅशवर (Joker’s Stash) विक्रीसाठी उपलब्ध आहेत, म्हणजेच ते चोरून त्यांची विक्री होत आहे. (हेही वाचा: भारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video))

जोकर स्टॅश हा एक मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जिथे क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती विकत घेतली जाते. जेमिनी अ‍ॅडव्हायझरीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मार्च ते डिसेंबर दरम्यान Wa Wa च्या पेमेंट सिस्टममध्ये व्हायरस पाठवून डेटा चोरी करण्यात आला आहे. मात्र कंपनीने याचा शोध घेतला आणि नंतर पेमेंट सिस्टम क्लीन केली गेली.

तुमच्याही बाबतीत ही गोष्ट घडू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. ऑनलाईन पेमेंटच्या वेळी कार्डचा तपशील वेबसाइटवर सेव्ह करू नका. सार्वजनिक आणि विनामूल्य वाय-फाय इंटरनेटवर नेट बँकिंग किंवा फोन बँकिंग वापरू नका. आपला डेबिट-क्रेडिट कार्ड पासवर्ड वेळोवेळी बदला. फिशिंग ईमेल आणि बनावट फोन कॉल टाळा.