Twitter Deal करण्यापूर्वी; एलन मस्क अचानक ट्विटर मुख्यालयात पोहोचले, प्रोफाइलच्या बायोमध्ये केले बदल

मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन 'ट्विटर हेडक्वॉर्टर' असे बदल केलं आहे. तसेच त्यांनी डिसक्रिप्टर 'चीफ ट्वीट' असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क ट्विटरवर ऑफिसमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Twitter Deal करण्यापूर्वी; एलन मस्क अचानक ट्विटर मुख्यालयात पोहोचले, प्रोफाइलच्या बायोमध्ये केले बदल
Photo Credit - Twitter

एलन मस्क (Elon Mask) बुधवारी ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले. न्यायालयानं शुक्रवारपर्यंत 44 बिलियन डॉलर्सची ही डील पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. या मुदतीच्या दोन दिवस आधीच एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर बायोमध्येही काही बदल केले आहेत. मस्क यांनी ट्विटर प्रोफाइलमध्ये लोकेशन 'ट्विटर हेडक्वॉर्टर' असे बदल केलं आहे. तसेच त्यांनी डिसक्रिप्टर 'चीफ ट्वीट' असं लिहिलं. त्यानंतर एलन मस्क ट्विटरवर ऑफिसमध्ये पोहोचल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, एलन मस्कने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये तो ट्विटर हेड क्वार्टरमध्ये एक बेसीन सिंक घेऊन जाताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Entering Twitter HQ – let that sink in!'.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 27, 2022 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).