Bangladesh PM Sheikh Hasina Resigned: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा राजीनामा, देशही सोडला; मीडियाचा सूत्रांच्या हवाल्याने दावा

Bangladesh PM Sheikh Hasina Reportedly Resigns: भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये अनेक वर्षांनंतर अभूतपूर्व संघर्ष (Political Crisis) उफाळला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या या प्राणघातक संघर्षानंतर पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina (Photo Credit -PTI)

Bangladesh PM Sheikh Hasina Reportedly Resigns: भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये अनेक वर्षांनंतर अभूतपूर्व संघर्ष (Political Crisis) उफाळला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या या प्राणघातक संघर्षानंतर पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनामा दिल्यानंतर हसीना यांनी तातडीने राजधानी ढाका (Dhaka) सोडले असून, त्या भारतामध्ये दाखल झाल्याचे वृत्त बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, हसीना यांच्या राजीनाम्याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही.

हसीना यांनी ढाका सोडल्याचे वृत्त

बांगलादेशमध्ये पाच दशकांपूर्वीच्या स्वातंत्र्यानंतरच्या काही भीषण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेख हसीना भारतातील त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे जात असल्याचे वृत्त 'बीबीसी बांगला'ने दिले आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्याबद्दल आणि त्या ढाकाहून निघून गेल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तथापि, त्यांनी आपल्या बहिणीसोबत हेलिकॉप्टरने बांगलादेशची राजधानी सोडल्याचे बोलले जात आहे.

हसीना पायउतार

खाजगी वृत्तवाहिनी 'जमुना टीव्ही'ने वृत्त दिले आहे की, शेख हसीना यांना त्यांच्या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करून पायउतार व्हावे लागले. 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या दिग्गजांच्या नातेवाईकांसाठी 30% सरकारी नोकऱ्या राखीव ठेवलेल्या वादग्रस्त कोटा प्रणालीमुळे आंदोलकांनाबळ मिळाले आणि बांगलादेशमध्ये संघर्ष सुरु झाला. (हेही वाचा: Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला, विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले)

बांगलादेशमध्ये इंटरनेट बंद

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख लवकरच देशाला संबोधित करतील अशी शक्यता आहे. वाढत्या हिंसाचाराला प्रतिसाद म्हणून सरकारने संपूर्ण इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले. तथापि, सोमवारी दुपारी 1:15 च्या सुमारास ब्रॉडबँड इंटरनेट सेवा अंशतः पूर्ववत करण्यात आली. (हेही वाचा, Bangladesh Protests: बांगलादेशमध्ये हिंसाचारात 72 जणांचा मृत्यू, असंख्य जखमी; सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू(Watch Video))

हिंसाचारात 14 पोलिसांसह किमान 101 जणांचा मृत्यू

आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये संघर्षाची लाट उसळली. बंगाली भाषेतील 'Prothom Alo' या वृत्तपत्रानुसार रविवारी झालेल्या हिंसाचारात 14 पोलिसांसह किमान 101 जणांचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी देशव्यापी कर्फ्यू लागू केला आणि मोबाइल इंटरनेट बंद केले.

आंदोलनामध्ये विद्यार्थी अग्रही

दरम्यान, आंदोलकांनी हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर धडक दिली. सोमवारी (5 ऑगस्ट) चकमकी वाढतच गेल्या, जत्राबारी आणि ढाका मेडिकल कॉलेज भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात सहा जण ठार झाले, असे द डेली स्टार वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

एक्स पोस्ट

'मार्च टू ढाका' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सकाळी 10 च्या आधी आणि नंतर ढाका सेंट्रल शहीद मिनार येथे जमले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र झाला. बांगलादेशच्या संघर्षमय पार्श्वभूमीवर देश सरकार आणि लष्करप्रमुखांच्या अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now