Baltimore Bridge Collapse: बाल्टीमोर ब्रिज दुर्घटनेत सहा बेपत्ता कामगारांचा मृत्यू; मेरीलँड राज्य पोलिसांची माहिती

अमेरिकेतील मेरिलँड प्रांतात बाल्टीमोर (Baltimore Bridge Collapse) येथे पटास्पको नदीवर असलेला ऐतिहासिक फ्रान्सीस स्कॉट पूल (Francis Scott Key Bridge) जहाजाच्या धडकेत कोसळला. या दुर्घटनेवेळी जहाजावर असलेले सहा कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. या कामगारांचा शोध घेतला जात आहे.

Baltimore Bridge Collapse | (Photo Credit - X)

अमेरिकेतील मेरिलँड प्रांतात बाल्टीमोर (Baltimore Bridge Collapse) येथे पटास्पको नदीवर असलेला ऐतिहासिक फ्रान्सीस स्कॉट पूल (Francis Scott Key Bridge) जहाजाच्या धडकेत कोसळला. या दुर्घटनेवेळी जहाजावर असलेले सहा कामगार अद्यापही बेपत्ता आहेत. या कामगारांचा शोध घेतला जात आहे. प्रदीर्घ काळ शोध घेऊनही या कर्मचाऱ्यांचा कोणताच ठावठिकाणा न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे स्थानिक मेरीलँड पोलिसांनी (Maryland State Police) म्हटले आहे. अमेरिकेच्या कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, बाल्टीमोर येथील पूल दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध आता थांबवला आहे.

रियर एडमिरल शैनन गिलरेथ यांनी म्हटले की, बाल्टमोर पूल दुर्घटनेतील बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा आम्ही पूरेपूर प्रयत्न केला. अनेक प्रयत्न करुनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर ही शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शोधमोहीम थांबवली असली तरी आम्हाला आशा आहे की, हे बेपत्ता कामगार कोठेतरी जीवंत असतील आणि लवकरच ते आपल्यामध्ये परततील. (हेही वाचा, US Baltimore Bridge येथे झालेल्या अपघातग्रस्त जहाजातील सर्व २२ भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित)

वृत्तसंस्था एएनायने म्हटले आहे की, बाल्टीमोर येथे पुलाला धडकलेले जहाज हे मालवाहू होते. ज्यामुळे ऐतिहासिक असा फ्रान्सिस स्कॉट ब्रिज कोसळला. या घटनेमुळे घटना घडली तेव्हा पुलावरुन प्रवास करणाऱ्या अनेक कार आणि लोक नदीत कोसळले. दरम्यान, दुर्घटनेसंबंधी पुढे आलेल्या माहितीनुसार, दुर्घटना होण्यापूर्वीच जहाजाच्या चालकाने मदत मागितली होती. सांगितले जात आहे की, विद्युतपुरवठ्याची समस्या निर्माण झाल्याने हे मालवाहू जहाज पुलाला धडकले. ज्यामुळे ही दुर्घटना घडली. (हेही वाचा, Francis Scott Key Bridge Collapses: मोठ्या जहाजाची धडक लागल्याने फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज कोसळला, मन विचिलीत करणारा Video आला समोर)

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बाल्टीमोर ब्रिज दुर्घटनेबद्दल तीव्र चिंता आणि दुर्घटनेचा फटका बसलेल्यांप्रती तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेमुळे धक्का पोहोचललेल्या सर्वांना लवकर आराम मिळावा अशी आमची प्रार्थना आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत या बंदरातील सर्व जलवाहतूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही बायडेन यांनी म्हटले आहे.

मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी सांगितले की, कंटेनर जहाजाने बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला धडकण्यापूर्वी 'आणीबाणी' असल्याचा कॉल (Mayday Call) केला. ज्यामुळे अधिकाऱ्यांनी वाहतूक थांबवली आणि पुलावरील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मूर म्हणाले की या जलद प्रतिसादामुळे जीव वाचविण्यात मदत झाली. हे लोक हिरो आहेत.

सिनर्जी मेरिटाइम ग्रुप या शिपिंग कंपनीने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की, जहाजात 22 भारतीय होते आणि ते सर्व भारतीय होते. जहाजावरील क्रू आणि त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल विचारले असता, NTSB चेअर होमेंडी म्हणाले, प्रश्न हा आहे की जहाजावर कोण होते आणि त्यांचे राष्ट्रीयत्व. मी त्याबद्दल परस्परविरोधी माहिती ऐकली आहे. मी जहाजावरील क्रू मेंबर्सची माहिती पाहिली आहे. आम्हाला अजूनही जहाजावरील क्रू सदस्यांची संख्या आणि त्यांची स्थिती तपासायची आहे, असेही त्यांनी म्हटले. यूएस परिवहन सचिव पीट बुटिगिएग यांनी जोर दिला की बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज, जो कोसळला, तो एक सामान्य पूल नव्हता आणि तो अमेरिकन पायाभूत सुविधांपैकी एक होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now