बगदाद: अमेरिकी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला
सध्यास्थितीत इराकमध्ये सुमरे 5000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत.
इराकची राजधानी बगदाद (Baghdad) येथे अमेरिकी सैन्याच्या (US Troops) लष्करी साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहन ताफ्यावर हल्ला झाला आहे. इराकच्या गृहमंत्रालयातील अधिकऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता वृत्तसंस्था सिन्हूआने म्हटले आहे की, ' वाहनांचा ताफा जात असलेल्या रस्त्याकडेला हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट केला.' वृत्तात पुढे म्हटले आहे की, पश्चिम इराकच्या अल-गजलियाह जवळून जात असलेल्या राज्य मार्गावरुन अमेरिकी लष्कराचा ताफा चालला होता. या वेळी ही घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेनंतर लष्कर आणि हल्लेखोर यांच्यात कोणतीही चकमक अथवा संघर्ष झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, अमेरिकी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटना, समूह अथवा व्यक्तीने घेतली नाही. इराकमध्ये गेल्या काही काळापासून अज्ञात आक्रमक समूहाकडून अमेरिकी लष्कराच्या केंद्र आणि ताफ्यावर हल्ला होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
इराकच्या जॉइंट ऑफरेशन्स कमांडच्या प्रसारमाध्यम कार्यालयाने म्हटले आहे की, बगदादच्या दक्षिणेला एका परिसरात अमेरिकी सैन्याच्या लष्करी साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांजवळ बॉम्बस्फोट झाला. गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराकमधून अमेरिकी सैन्य परत बोलावण्याबाबत सुतोवच केले होते. (हेही वाचा, पाकिस्तान-बांग्लादेश यांच्यात वाढतीय जवळीक? इमरान खान यांचा शेख हसीना यांना फोन)
दरम्यान, अमेरिका आणि इराक यांनी संयुक्तरित्या दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत म्हटले होते की, अमेरिका येत्या काही महिन्यांमध्ये इराकमधून आपले लष्कर टप्प्याटप्प्याने मागे घेईन. सध्यास्थितीत इराकमध्ये सुमरे 5000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत.
द न्यूयॉर्क टाइन्सने गेल्याच आठवड्यात अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते की, अमेरिका आणि इराक अधिकारी चर्चा करत आहेत. येत्या काळात सुमारे 3500 अमेरिकी सैनिक इराकमधून अमेरिका परत बोलवण्याची शक्यता आहे.