Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी; दोन महिन्यांत भारतात येऊ शकतं 'हे' मोठं संकट
बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशाचा नॉस्ट्राडेमस म्हणतात.
Baba Vanga Prediction: बल्गेरियाचे भविष्यकार बाबा वेंगा (Baba Vanga) हे जगातील प्रसिद्ध संदेष्ट्यांपैकी एक आहेत. बाबा वांगा यांनी 2022 वर्षासाठी (Baba Vanga 2022 Predictions) अनेक भयावह भविष्यवाण्या केल्या होत्या. भाकितांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वांगाच्या अनेक भविष्यवाण्या (Baba Vanga Prediction) नुकत्याच खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशाचा नॉस्ट्राडेमस म्हणतात. बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी केलेले दोन अंदाज आतापर्यंत खरे ठरले आहेत. सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या 9/11 च्या हल्ल्यांसह बाबा वेंगा यांनी केलेले अनेक भाकीत खरे ठरले आहेत. बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांच्या भाकितांवर संपूर्ण जगाचा विश्वास आहे. आता बाबा वेंगाचे भारताबाबतचे भाकीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की, 2022 मध्ये जगातील तापमान कमी होईल. त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल. अन्नाच्या शोधात टोळ भारतावर हल्ला करतील. टोळांच्या हल्ल्यात पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे भारतात उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊन देशात उपासमारीची शक्यता आहे. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर देशात मोठा पेच निर्माण होऊ शकतो. याआधीही बाबा वेंगाचे अनेक भाकीत खरे ठरले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - Saudi Arabia Visa: सौदी अरेबियाने दाखवली भारताशी मैत्री; भारतीयांना यापुढे व्हिसासाठी द्यावे लागणार नाही Police Clearance Certificate)
बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी अनेक भयानक भविष्यवाण्या केल्या. यामध्ये काही देशांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे समस्या निर्माण झाल्याची चर्चा होती. पोर्तुगाल आणि इटलीसारख्या देशांनी लोकांना कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे. या देशांमध्ये 1950 पासून सर्वात कमी पाऊस पडत आहे.
बाबा वेंगा म्हणाले होते की, यावर्षी आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पूर येईल. याशिवाय भूकंप आणि सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्याला तडाखा बसला. बांगलादेश, भारताच्या ईशान्येकडील प्रदेश आणि थायलंडमधील लोकांनाही पुराचा फटका बसला आहे. बाबा वेंगाचे हे भाकीतही खरे ठरल्याचे दिसते.
कोण होती बाबा वेंगा?
बुल्गेरियामध्ये राहणारी ज्योतिषी बाबा वेंगा ही फकीर होती. वेंगा आंधळा होती. ज्यांचे अनेक भाकीत खरे ठरले आहेत. 1911 मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. त्यांचे 85 टक्के अंदाज खरे ठरल्याचे सांगण्यात येत आहे. ऑगस्ट 1996 मध्ये बाबा वेंगा यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले. परंतु, मृत्यूपूर्वी त्यांनी सन 5079 पर्यंत भाकीत केले होते.