Indian Missing Student Found Dead In Us: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्या मोहम्मद अब्दुल अराफातचा मृतदेह सापडला

त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. अराफतसोबत राहणाऱ्या तरुणाने अराफतच्या वडिलांना पोलिसांत हरवल्याची तक्रार केल्याचे सांगितले होते.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Indian Missing Student Found Dead In Us: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. गेल्या महिन्यात बेपत्ता झालेला भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफत (Mohammad Abdul Arafat) याचा मृतदेह सापडला आहे. मोहम्मद अब्दुल अराफात यांचा मृतदेह अमेरिकेतील क्लीव्हलँड येथून सापडला आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. मोहम्मद अब्दुल अराफत हा हैदराबाद येथील रहिवासी होता. तो गेल्या वर्षी मे महिन्यात क्लीव्हलँड विद्यापीठातून आयटीमध्ये मास्टर्स शिकण्यासाठी अमेरिकेत आला होता.

अराफतचे वडील मोहम्मद सलीम यांनी सांगितले की, 7 मार्च रोजी अराफातशी शेवटचे बोलले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. अराफतसोबत राहणाऱ्या तरुणाने अराफतच्या वडिलांना पोलिसांत हरवल्याची तक्रार केल्याचे सांगितले होते. 19 मार्च रोजी, अराफातच्या कुटुंबाला एक निनावी कॉल आला की अराफातचे ड्रग टोळीने अपहरण केले होते आणि त्याच्या सुटकेसाठी 1,200 डॉलरची मागणी केली होती. (हेही वाचा -Indian Student Dies IN US: ओहायो येथे भारतीय विद्यार्थिंनीचा मृत्यू, पोलिस तपास सुरु; कारण अस्पष्ट)

अराफतच्या वडिलांनी सांगितले की, कॉल करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली होती की, जर खंडणीचे पैसे दिले नाहीत तर तो अराफतची किडनी विकेल. मोहम्मद सलीमने सांगितले की, जेव्हा आम्ही कॉलरला पैसे कसे भरायचे विचारले तेव्हा त्याने याबद्दल माहिती दिली नाही. आम्ही आमच्या मुलाशी बोलण्याची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. आता अराफत यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात भारतीय विद्यार्थिनी उमा सत्य साई गडदे हिचा ओहायो येथे मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोहम्मद अराफत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वाणिज्य दूतावासाने लिहिले की, 'मोहम्मद अब्दुल अराफात, ज्याचा शोध घेतला जात होता, तो क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत आढळून आल्याने अतिशय दुःख झाले आहे.