US Court Rejected Trump's Appeal: डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाकडून पुन्हा मोठा झटका; अमेरिकन कोर्टाने फेटाळले अपील
2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो की नाही याबद्दल विशेष वकील जॅक स्मिथ यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी होणार नाही, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.
US Court Rejected Trump's Appeal: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन कोर्टाने (US Court) लवकर सुनावणीसाठी ट्रम्प यांचे अपील फेटाळले आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो की नाही याबद्दल विशेष वकील जॅक स्मिथ यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणी होणार नाही, असे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले. ट्रम्प यांच्यासाठी हा आणखी एक धक्का आहे.
दरम्यान, 2024 च्या निवडणुकीत आपल्या उमेदवारीचा दावा करण्यासाठी ट्रम्प प्रचारात व्यस्त आहेत. या प्रकरणाची पुढील वर्षी 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या मुद्द्यावर आता यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किटमध्ये निर्णय घेतला जाईल, ज्याने सूचित केले आहे की ते निर्णयासाठी या प्रकरणाची त्वरीत सुनावणी करेल. (हेही वाचा -Donald Trump Disqualified: डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका, न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदासाठी केले अपात्र घोषित, निवडणूक लढवता येणार नाही)
या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील एका न्यायालयाने ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले होते. याप्रकरणी ट्रम्प सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची वाट पाहत आहेत. ट्रंपचे वकील स्मिथ यांनी सर्वोच्च न्यायालयाला या खटल्याचा जलद निर्णय घेण्याच्या महत्त्वपूर्ण सार्वजनिक हिताचा हवाला देत हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. न्यायाधीशांनी शुक्रवारी त्यांच्या आदेशात स्मिथची विनंती नाकारली आणि त्यांच्या निर्णयाचे कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.