Anju Not Marrying Nasrulla: राजस्थानमधून नसरुल्लाला भेटण्यास पाकिस्तानला गेलेली अंजू 20 ऑगस्टला भारतात परतणार

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील अंजू सध्या पेशावरपासून 300 किमी अंतरावर असलेल्या कुलशो नावाच्या गावात नसरुल्लाच्या घरी राहते.

34 वर्षीय विवाहित भारतीय महिला अंजू, जी तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील एका दुर्गम गावात गेली होती, लवकरच ती भारताता परतणार आहे. नसरुल्ल्लाला सोबत लग्न करुन पाकिस्तानात स्थायिक होण्याचा तिझा कोणताही मानस नसल्याचे समोर आले आहे, तसेच तिचा व्हिसा संपल्यानंतर मायदेशी परतणार नाही. 29 वर्षीय नसरुल्लाने आपला अंजूशी कोणताही प्रेम प्रसंग नसल्याचे जाहीर केले आहे. "अंजूशी लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही," आणि 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यावर ती भारतात परत येईल, असे आश्वासन त्याने दिले आहे. (हेही वाचा - North Korea Launched Missile: 'उत्तर कोरियाने डागले संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र'; जपानचा मोठा दावा)

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील अंजू सध्या पेशावरपासून 300 किमी अंतरावर असलेल्या कुलशो नावाच्या गावात नसरुल्लाच्या घरी राहते. तिचे वडील गया प्रसाद थॉमस यांनी तिची मानसिक स्थिती आणि कृतींबद्दल धक्कादायक दावे केले आहेत आणि ती कोणत्याही प्रकरणामध्ये गुंतलेली नाही असे सांगितले आहे.

अंजूचे पती अरविंद कुमार यांच्या म्हणण्यानुसार अंजूने तिला जाण्याआधी कळवले होते. त्यानंतर त्याला तिच्याकडून एक व्हॉईस कॉल आला, ज्यामध्ये ती लाहोरमध्ये असल्याचे उघड झाले. ती पाकिस्तानात का होती आणि तिला व्हिसा कसा मिळवता आला याबद्दल त्यालाही काही माहिती नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement