America Mask Rules: कोरोना लसीकरण पूर्ण झालल्या नागरिकांनी मास्क लावण्याची आवश्यकता नाही- अमेरिका

म्हणजेच ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे लोक मास्क न लावता घराबाहेर पडू शकतात.

America Mask Rules | Representative Image (Photo Credits: Pixabay)

प्रदीर्घ काळानंतर अमेरिकेमध्ये (America ) 'तो' दिवस उजाडला आहे. ज्याची अवघे जग आणि अमेरिकन नागरिक वाट पाहात होते. अमेरिका (USA) सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे ते नागरिक मास्क न घालता घराबाहेर पडू शकतात. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मास्क (Mask) लावण्याची मुळीच आवश्यकता नाही. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (Centers for Disease Control and Prevention) विभागाने ही घोषणा केली आहे. सीडीसी (CDC) ने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहेत ते मास्क न लावता घराबाहेर पडू शकतात. सार्वजनिक आणि खासगी ठिकाणीही फिरू शकतात. तसेच या लोकांनी सोशल डिस्टन्सींग पाळण्याचीही गरज नाही.

सीडीसी निर्देशक रोशेल वॉलेंस्की यांनी व्हाईट हाऊसला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांनी कोरोना व्हायरस लसीकरण पूर्ण केले आहे. म्हणजेच ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे लोक मास्क न लावता घराबाहेर पडू शकतात. शिवाय त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचीही आवश्यकता नाही. हे लोक एकत्र येऊ शकतात आपले जीवन पूर्वीप्रमाणे साजरे करु शकतात.

पुढी बोलताना सीडीसी निदेशकांनी म्हटले आहे की, जर आपण कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे तर आपण आपले ते आयुष्य सुरु करु शकता. जे आपण महामारी सुरु झाल्यावर बंद केरे होते. वृत्तसंस्था सिन्हुआ च्या हवाल्याने आयएनएसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, आम्ही सर्व त्या क्षणासाठी अतूर आहोत. जेव्हा आमची सर्व परिस्थीती अत्यंत सामान्य होईल. (हेही वाचा, COVID Vaccine Shortage असताना दोन डोस मधील अंतर वाढवणं Reasonable Approach, प्रभाव कमी होत नसल्याची Dr Anthony Fauci ची प्रतिक्रिया)

कोरोना लसीकरण वेगाने होत नसल्याने सीडीसीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. मात्र,आता कोरोना लस घेतलेल्या नागरिकांसाठी अमर्याद स्वातंत्र्याचा पुन्हा एकदा अधिकार मिळाल्याने नागरिक खूश होत आहेत. विशेष म्हणजे विमान, बस, रेल्वे अशा कोणत्याही प्रवासात लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना मास्क लावण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, प्राप्त आकडेवारीनुसार अमेरिकेत सुमारे 15.4 कोटी नागरिकांना कोविड-19 लसीकरणा दरम्यान किमान एक डोस मिळाला आहे. तर जवळपास11.76 कोटी लोकांचे पूर्ण कोरोना लसीकरण झाले आहे. म्हणजेच या लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif