Amazon Job: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचा बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न; 75 हजार लोकांना देणार नोकऱ्या
अशा परिस्थितीत एकीकडे लोक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंगवर अधिक अवलंबून आहेत
जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसच्या भीतीच्या छायेखाली वावरत आहेत, यामुळेच बर्याच देशांमध्ये लॉकडाऊचालू आहे. अशा परिस्थितीत एकीकडे लोक आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंगवर अधिक अवलंबून आहेत, तर दुसरीकडे कोट्यवधी नोकर्या जाण्याची शक्यताही वाढत आहे. हे लक्षात घेता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने 75,000 लोकांना कामावर घेण्याची घोषणा केली आहे. ही भरती गोदाम कर्मचाऱ्यांपासून ते डिलिव्हरी बॉयज पर्यंत असणर आहे. अॅमेझॉनने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सध्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित ऑर्डर आहेत, ज्यांना पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची आवश्यकता आहे.
अशा परिस्थितीत कंपनी 75,000 लाख लोकांना रोजगार देण्याचा विचार करीत आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगद्वारे म्हटले आहे की, 'आम्हाला माहित आहे की या कोरोना व्हायरस साथीमुळे बर्याच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि प्रवास यासारख्या क्षेत्रांवर वाईट संकट आले आहे. या क्षेत्रामधील अनेक लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या कंपनीमध्ये त्यांचे स्वागत करतो.’ कंपनीने म्हटले आहे की, आधीच्या जाहिरातीनुसार त्यांनी अमेरिकेत 1 लाख लोकांची भरती केली आहे. आता कंपनी इतर 75 हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. (हेही वाचा: मेरा भारत महान: कोरोना व्हायरसच्या लढाईबाबत भारताचे केले कौतुक; अमेरिकेमधील तेलुगु NRI विरोधात न्यू जर्सी येथे गुन्हा दाखल)
कोरोना व्हायरसमुळे वाढत असलेल्या बेरोजगारीचा दर लक्षात घेता Amazon नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. नवीन कर्मचार्यांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने प्रति तास 15$ डॉलर्स किमान वेतनामध्ये 2 $ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो एप्रिलमध्ये अंमलात येईल. अॅमेझॉन असे म्हणतात, की ते जागतिक स्तरावर वेतन वाढविण्यासाठी $ 500 दशलक्षाहून अधिक खर्च करू शकतात. गेल्या वर्षी हा आकडा 35 दशलक्ष डॉलर्स होता.