All is Well! सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य; इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं सूचक ट्विट
त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत 'सगळं काही ठीक आहे,' असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये अमेरिकेकडे असलेल्या सैन्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
इराणने बुधवारी अमेरिकेच्या लष्करी तळावर 12 क्षेपणास्त्रांचा हल्ला करत पलटवार केला. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी ट्विट करत 'सगळं काही ठीक आहे,' (All is Well!) असं म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये अमेरिकेकडे असलेल्या सैन्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या 2 लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर तेथील जीवितहानी आणि नुकसानाची माहिती घेतली जात आहे. परंतु, आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी (गुरुवारी) आम्ही यासंदर्भाच निवेदन जारी करु.' (हेही वाचा - इराणचा अमेरिकेवर पलटवार; लष्करी तळांवर डागली 12 क्षेपणास्त्रे)
इराणकडून बुधवारी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. दरम्यान, इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तचेस अमेरिकेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 30 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्याता आला आहे. परंतु, ट्रम्प यांनी सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं आहे.
अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. अमेरिका-इराण हे दोन्ही देश एकमेकांना हल्ल्याच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत आहेत. तसेच हे प्रतिउत्तराचे सत्र सुरू असतानाच मागील आठवड्यात इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला होता. याचा अर्थ इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचा हा संकेत आहे, असं म्हटलं जात आहे.