All About Taliban: तालिबान काय आहे? तालिबानी संघटन, स्थापना, ओसामा बीन लादेनची एण्ट्री आणि अफगान जनतेची फरफट

त्यात त्यांनी आपली ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांतून ऐकायला पाहायला, वाचायला मिळणाऱ्या या वृत्तांमुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हे तालीबान प्रकरण आहे तरी नेमके काय? जाणून घेऊया तालीबानी संघटन, स्थापना कारवाया (All About Taliban) यांविषयी.

Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

अफगानिस्तान (Afghanistan) पूर्णपणे तालिबानी (Taliban) वर्चस्वाखाली गेला आहे. अमेरिकेने (United States) आपल्या सौन्याच्या फौजा अफगानिस्तानाताून परत बोलावल्या. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच अफगानिस्तानवर तालीबानी संघटनेने (Taliban Organization) कब्जा मिळवला. अफगानिस्तानचे पंतप्रधान अशरफ गनी (Ashraf Ghani) हे सध्या भूमिगत आहेत. त्यांनी अफगानिस्तानातून पळ काढल्याचे वृत्त आहे. राजधानी काबुल (Kabul) कब्जात घेतल्यावर  लगोलग तालिबान्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. त्यात त्यांनी आपली ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांतून ऐकायला पाहायला, वाचायला मिळणाऱ्या या वृत्तांमुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हे तालीबान प्रकरण आहे तरी नेमके काय? जाणून घेऊया तालीबानी संघटन, स्थापना कारवाया (All About Taliban) यांविषयी.

तालीबान शब्दाचा अर्थ काय?

तालीबान या शब्दाचा मूळ अर्थ आहे 'विद्यार्थी'. तालीबान हा शब्द पश्तो जुबान मधून आला आहे. शित युद्धाच्या काळात अमेरिका आणि रशीया ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतली होती. त्यातून हे दोन्ही देश जगभरातील अनेक छोट्या छोट्या देशांवर आपला प्रभाव विविध प्रकारे ठेऊन होती. यात सैन्याचाही समावेश आहे. अफगानिस्तानमध्ये रशियाचै सैन्य होते. रशियाने हे सैन्य साधारण 1990 च्या सुमारास परत बोलावले. या काळात पहिल्यांदा तालीबान संघटनेचा उदय झाला. खरे तर असे सांगितले जाते की, पश्तो आंदोलन (विद्यारथी आंदोलन) पहिल्यांदा धार्मिक मदरसे आणि तशाच संस्थांमधून सुरु झाले. या आंदोलनास सौदी अरेबिया आर्थिक रसद पुरवत होती. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रामुख्याने सुन्नी इस्लाम आणि कट्टरतावादाचा प्रचार केला जात असे. कट्टरतावादाचा प्रचार प्रसार करत सुरुवात झालेली ही संघटना आता अधिकच ताकदवान झाली आहे. गेली अनेक वर्षे या संघटनेने अफगानिस्तानला युद्धभूमीचे स्वरुप दिले आहे. (हेही वाचा, मुस्लिम ब्रदरहूड: विचार, कार्य आणि दहशतवाद)

तालिबान स्थापना आणि संस्थापक

अफगानिस्तान सोबतच 1990 च्या सुमारास तालीबानी अस्तित्व उत्तर पाकिस्तानातही दिसू लागले. अफगानिस्तानातून सोव्हीयत रशियाच्या फौजा परत जाताच तालीबानचे वर्चस्व अधिक वाढत गेले. तालीबानने सुरुवातीला कंधार (Kandahar) शहरात आपला डेरा टाकला. कधी काळी अफगानिस्तानवर (दुसऱ्या महायुद्धानंतर) सोव्हीयत रशियाचे वर्चस्व होते. 1989 च्या सुमारास मुजाहिद्दीन नामक संघटनेने मोठे बंड छेडले. या संघटनेचा कमांडर होता मुल्ला मोहम्मद उमर (Mohammed Omar). हा मुल्ला मोहम्मद उमर हा आदिवासी समुहाचा सदस्य पश्तून म्हणजेच विद्यार्थी होता. त्यानेच पुढे जाऊन तालिबान या संघटनेची स्थापना केली.

Taliban (Photo Credits: Getty Images)

तालिबान, अफगानिस्तान आणि सत्तांतर

सोव्हियत युनियनच्या फौजा परत गेल्यानंतर तालिबानने अफगानिस्तानमध्ये सत्ता हातात घेतली. अफगानिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती बुरहानुद्दीन रब्बानी यांनी सत्तेतून पदच्युत करण्यात आले. विशेष म्हणजे बुरहानुद्दीन रब्बानी हे सोव्हित फौजांचा विरोध करणाऱ्या अफगान मुजाहीद्दीनच्या संस्थापकांपैकी एक होते. साधारणपणे 1990 ते 1998 पर्यंत अफगानिस्तानवर तालीबानचे वर्चस्व कायम राहिले. सोव्हियत सौन्याच्या काळात सत्तेत असलेल्या मुजाहिद्दीन सरकार आणि लष्कराच्या जाचाला अफगान जनता विटली होती. त्यांना बदल हवा होता. त्यामुळे त्यांनी तालीबानच्या सत्तांतराचे मनापासून कौतुक केले. आराजकतेच्या स्थितीला काहीसा विसावा मिळाला. सुरुवातीच्या काळात तालीबान नियंत्रीत प्रदेशांमध्ये रस्त सुधारणा, विविध सेवा सुधारणा अशा गोष्टी करण्यास तालीबानने प्राधान्य दिले. ही कामे अफगान जनतेच्या मनात लोकप्रियही ठरली.

अफगान जनतेचा अपेक्षाभंग

सुरुवातीच्या काळात तालीबाने हाती घेतलेले सुधारणा कार्य पाहून अफगान जनतेने त्यांचे समर्थन केले. अनेकांना वाटले अफगानिस्तान भ्रष्टाचार आणि अराजगतेच्या गर्तेतून बाहेर पडला. पण तसे घडले नाही. अल्पावधीतच तालिबानने हळूहळू आपले दात दाखविण्यास सुरुवात केली. तालीबानने त्यांचे स्वघोषीत असे अत्यंत कडक नियम जनतेवर लादण्यास सुरुवात केली. चौरी प्रकरणापासून ते थेट हत्येच्या आरोपींना भर चौकात शिक्षा देण्यात येऊ लागली. नागरिकांवर कट्टरतावादाचा पुरस्कार करण्यात आला. टीव्ही, संगीत, शिक्षण, फॅशन, स्वातंत्र्य या सर्वांवर बंदी घालण्यात आली. महिलांना तर थेट पारतंत्र्यातच टाकले. महिलांनी बुरखा घातलाच पाहिजे, महिलांनी एकटीने कुठेही प्रवास करु नये. घराबाहेर पडू नये. 10 वर्षांवरील महिलांनी सक्तीने आपले शरीर पूर्णपणे झाकावे तसेच शिक्षण घेऊ नये शिवाय यांसारखे नियम लागू करण्यात आले. पुरुषांनी दाढी ठेवावी यासाठी सक्ती करण्यात आली. पुरुषांनी दाढी ठेवायलाच पाह ज्यामुळे अफगान जनतेचा अपेक्षाभंग झाला.

ओसामा बिन लादेन ची एण्ट्री, तालीबान आणि अमेरिका

11 सप्टेंबर 2011 या दिवशी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीवर हल्ला झाला. या घटनेनंतर पहिल्यांदाच तालीबान जगाच्या नजरेत आला. तालीबानबाबतच्या बातम्यांनी जगभरातील प्रसारमाध्यमांचे मथळे भरुन गेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा म्होरक्या होता ओसामा बीन लादेन. ओसामा जेव्हा अमेरिकेवरील हल्ल्याची योजना आखत होता तेव्हा तालीबान त्याला सहकार्य करत होती. या हल्ल्यामागे ओसामा बीन लादेन असल्याचे लगेचच स्पष्ट झाले. तसेच तो तालीबानकडे असल्याचेही पुढे आले. अमेरिकेने तालीबानला ओसामाचा ताबा देण्याची मागणी केली. जी तालीबानने फेटाळून लावली. त्यामुळे चिडलेल्या अमेरिकेने अफगानिस्तानमध्ये घुसून मुल्ला ओमार यांचे सरकार बरखास्त केले. या संघर्षाच्या काळात ओमार आणि इतर तालीबानी नेते पाकिस्तानात पळून गेले. काही कालावधीनंतर त्यांनी पुन्हा अफगानिस्तानमध्ये परतन्याची योजना सुरु केली होती. तोवर अमेरिकी लष्कराने अफगानिस्तानमध्ये तालीबान्यांचा पाडाव केला होता.

तालीबानची पहिली पत्रकार परिषद (ऑगस्ट 2021)

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमे आपल्या वृत्तात दावा करतात की, तालीबान आता अधिक शक्तीमान झाला आहे. जवळपास 85 हजार तरुण या संघटनेत स्वत:हून सहभागी झाले असल्याचे सांगितले जाते. तसेच, अफगानिस्तानमध्ये तालीबानने किती टक्के प्रदेश काबीज केला आहे याबाबत अनेकांच्या मनात दुमत आहे. परंतू, हे वास्तव आहे की अफगानिस्तानमध्ये बहुतांश भागाचा ताबा तालीबान्यानी मिळवला आहे. अमेरिकी लष्कराने 20 वर्षांनंतर काढता पाय घेतल्यावर तालीबान्यांनी अवघ्या काही महिन्यातच हिंसेच्या जोरावर अफगानिस्तानवर ताबा मिळवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif