Alexei Navalny: ॲलेक्सी नवलनी यांच्या समर्थक गटाकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी; मृतदेह अद्यापही गायब
नवलानी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे तरुण (47) आणि तडफदार टीकाकार आणि मानले जात
अलेक्सी नवलानी यांचा मृत्यू (Alexei Navalny Death) झाला आहे मात्र, त्यांचा मृतदेह अद्यापही त्यांच्या कुटुंबाला मिळाला नाही, असा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. नवलानी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे तरुण (47) आणि तडफदार टीकाकार आणि मानले जात. नवलनी यांच्या गूढ मृत्यूमुळे जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचे प्रवक्ते किरा यार्मिश (Kira Yarmysh) यांनी रशियन अधिकाऱ्यांवर मारेकरी असल्याचा आरोप केला असून त्यानी नवलनींचा मृतदेह तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांना देण्याची मागणी केली आहे. तुरुंगात फेरफटका मारत असलेल्या नवलानी अचानक खाली कोसळले आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही पुढे आले नसल्याने संशय आणखीच वाढला आहे. त्यांच्या मृत्यूची निष्पक्ष तपासणी केली जावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
तपासाच्या नावाखाली मृतदेह सुपूर्त करण्यास नकार
दरम्यान, रशियन अधिकाऱ्यांनी अलेक्सी नवलानी यांची आई ल्युडमिला यांना शनिवारी सांगितले की, नवलानी यांच्या मृत्यूचा तपास पूर्ण झाल्याखेरीच कोणालाही त्यांचा मृतदेह सुपूर्त केला जाणार नाही. नवलनीचे प्रवक्ते, किरा यार्मिश यांनी X वरील एका पोस्टमध्ये सांगितले की, नवलनीच्या आईने वकिलासोबत रशियातील सालेखार्ड शवागारालाही भेट दिली, परंतु त्यांचा मृतदेह मिळू शकला नाही. पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, 'ॲलेक्सीचे वकील आणि त्याची आई सालेखार्ड शवागारात आले आहेत. मात्र ते बंद आहे. आम्हाला खात्री आहे की त्याचा मृतदेह तिथेच आहे. आम्ही दरवाजावरील फोन क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा उत्तर आले की, शवागर सध्या बंद आहे नंतर कॉल करा. तसेच, नवलानी यांचा मृतदेह शवागरात नाही.' (हेही वाचा, Vladimir Putin यांचे टीकाकार Alexei Navalny यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर Alexander Murakhovsky बेपत्ता)
पुतीन यांच्यावर जगभरातून टीका
दुसऱ्या बाजूला नवलानी यांच्या मृत्यूची जगभरातून दखल घेतली जात आहे. या मृत्यूबद्दल तीव्र चिंता आणि टीका होत आहे. खास करुन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या नेतृत्वाखाली पाश्चात्य नेत्यांकडून तीव्र टीका होत आहे. या सर्वांनी नवलानी यांच्या धैर्याला आदरांजली वाहिली. तसेच,या मृत्यूला राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला. इंग्लंडने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, या मृत्यूचे रशियावर दूरगामी परिणाम होतील. नवलनी यांच्या मृत्यूबद्दल बोलताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे "ठग" म्हटले आणि त्यांना "रशियन राज्याचे कायदेशीर प्रमुख" म्हणून समजणे "मूर्खपणाचे" असल्याचे सांगितले. रशियातील या नव्या गूढ मृत्यूमुळे या देशातील सामान्य नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.