Top Taliban Leader: तालिबान संघटनेतील प्रमुख नेते, ज्यांच्यावर आहे विविध विभागांची जबाबदारी

अमेरिकेने मात्र याला जोरदार विरोध दर्शवला आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, अफगानिस्तानचे नेतृत्व कोण करणार? दरम्यान, हा सवाल कायम असताना अफगानिस्तानातील बहुचर्चीत राहिलेल्या नेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अफगानिस्तानात बहुचर्चेत राहिलेल्या नेतृत्वांवर टाकलेली ही एक नजर.

Taliban (Photo Credits: Getty Images)

Afghanistan Crisis: अफगानिस्तान (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानी (Taliban) राजवाटीखाली आला आहे. अमेरिकेचे सैन्य पाठीमागे गेल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तालीबान्यांनी अफगानिस्तानवर कब्जा (Afghanistan Under Of Taliban) मिळवला. तालीबान ही एक क्रूर दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे या संघटनेने अफगानिस्तानसारक्या देशाचा कब्जा मिळवल्याने अवघे जग चिंतेत आहे. दरम्यान, चीन आणि रशियासारख्या देशांनी अफगानिस्तानातील तालीबान सरकारला मान्यता देण्याची हमी घेतली आहे. अमेरिकेने मात्र याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, अफगानिस्तानचे नेतृत्व कोण करणार? तालीबान की इतर कोणते दुसरे सरकार? दरम्यान, हा सवाल कायम असताना अफगानिस्तानातील बहुचर्चीत राहिलेल्या नेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अफगानिस्तानात बहुचर्चेत राहिलेल्या नेतृत्वांवर (Top Taliban Leader) टाकलेली ही एक नजर.

हैबतुल्लाह अखुंदजादा

हैबतुल्लाह अखुंदजादा हा तालीबानचा सुप्रीम कमांडर होता. एक वेळ अशी होती की तालीबानमध्ये हैबतुल्लाह अखुंदजादा याचा शब्द शेवटचा असे. अवघी तालीबान हैबतुल्लाह अखुंदजादा याच्या इशाऱ्यावर नाचत असे. 1961 मध्ये जन्मलेल्या हैबतुल्लाह अखुंदजादा याने 2016 मध्ये तालीबानची धुरा सांभाळली होती. सुरुवातीला तो पाकिस्तानी मशिदीमध्ये शिक्षण घेत असे. कालांतराने कधीतरी तो तालिबानच्या संपर्कात आला आणि त्या संघटनेचा नेता झाला. धार्मिक नेता अशी ओळख असलेला हैबतुल्लाह अखुंदजादा हा तालीबानचा तिसरा सुप्रीम कमांडर होता. (हेही वाचा, All About Taliban: तालिबान काय आहे? तालिबानी संघटन, स्थापना, ओसामा बीन लादेनची एण्ट्री आणि अफगान जनतेची फरफट)

मुल्ला अब्दुल गनी बरादर

हैबतुल्लाह अखुंदजादा याच्यानंतर तालिबानमध्ये सर्वात लोकप्रिय कोण असेल तर तो मुल्ला अब्दुल गनी बरादर. तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर हा सध्या अफगानिस्तानच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमधील सर्वात मोठा दावेदार आहे. तो मुल्ला उमर याचा सर्वात विश्वासून कमांडर म्हणूनही ओळखला जातो. ISI ने त्याला 2010 मध्ये अटक केली होती. परंतू, वाटाघाटीनंतर त्याला 2018 मध्ये सोडून देण्यात आले होते. त्याचा जन्म उफगानिस्तानातील उरुजगान प्रांतात 1968 मध्ये झाला होता. 1980 च्या दशकात रशियाविरुद्धच्या संघर्षात अफगानिस्तानच्या बाजूने त्याने लढाईही लढली होती.

सिराजुद्दीन हक्कानी

सिराजुद्दीन हक्कानी हे प्रकरण काहीसे विचित्रच आहे. विविध दहशतवादी संघटनांचा तो प्रमुख आहे. 2016 मध्ये हक्कानी नेटवर्क या संघटनेचे तालीबानमध्ये विलीनीकरण झाले. आता तो तालीबानचा उपनेता आहे. हक्कानी तालीबानच्या आर्थिक विभाग आणि संपत्तींची जबाबदारी पार पाडतो. अनेक घातपाती कारवायांचा माष्टरमाईंड म्हणून त्याला ओळखले जाते. अमेरिकेच्या मोस्ट वॉंडेड यादीत त्याचा समावेश आहे. कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे स्पष्ट होताच त्याला पाकिस्तानातील कराची येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो वयाच्या चाळीशीत असल्याचे बोलले जाते.

मोहम्मद याकूब

मोहम्मद याकूब हा तालीबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा मुलगा आहे. तो तालिबानमधील मिलिट्री डिवीजनची कमान सांभाळतो. याकूब तालिबानच्या नेतृत्वाशी संबंधीत असलेल्या मवाळ गटाचा नेता आहे. त्याने तालिबान आणि अल कायदाच्या कट्टरपंथी मदरशांमध्ये शिक्षण घेतले आहे. जै-ए-मोहम्मदचा मुख्य मसूद अजहरच्या नेतृत्वाखाली त्याने गुरिल्ला लढाईचे शिक्षण घेतले आहे. तसेच हत्यार चालविण्यातही तो निष्णात असल्याचे सांगितले जाते.

अब्दुल हकीम हक्कानी

अब्दुल हकीम हक्कानी हा तालिबानचा प्रमुख प्रवक्ता आणि शांतता विभागाचा सदस्य आहे. अब्दुल हकीम हक्कानी तालीबानच्या न्याय विभागाचाही प्रमुख आहे. तो काही काळ न्यायाधीशही राहिला आहे. दोहा येथे तो निगोशिएशन टीमचा प्रमुख होता. तो तालीबानच्या विद्यमान प्रमुखाचा डावा हात म्हणून ओळकला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif