Afghanistan: लग्नात गाणी वाजवल्याने मिळाली शिक्षा, तालिबान्यांनी 13 लोकांना केले ठार

अशातच नुकतीच येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालिबान्यांच्या तरुणांनी एका लग्नात गाणी वाजवल्याने 13 लोकांना ठार केले आहे.

Taliban (Photo Credits: Getty Images)

Afghanistan: अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर  तालिबान्यांची क्रुरता काही कमी होत नाही आहे. अशातच नुकतीच येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालिबान्यांच्या तरुणांनी एका लग्नात गाणी वाजवल्याने 13 लोकांना ठार केले आहे. हे प्रकरण अफगाणिस्तान मधील नेंगरहार प्रांतातील आहे. याची माहिती अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी दिली आहे.(पाकिस्तानात पुन्हा एकदा पूजा स्थळांवर हल्ला, सिंध येथे मंदिरांची तोडफोड आणि चोरी करत धार्मिक दंगली घडवून करण्याचा कट)

अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट करत म्हटले की, 'नानगरहारमध्ये एका लग्नाच्या पार्टीत संगीत वाजवताना तालिबानी सैनिकांनी 13 जणांची हत्या केली. निषेध करून आपला राग व्यक्त करता येत नाही. 25 वर्षे पाकिस्तानने त्यांना अफगाण संस्कृती नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले आणि आमच्या मातीवर कब्जा करून कट्टर आयएसआयची राजवट प्रस्थापित केली. जे आता आपले काम करत आहेत. तालिबानची पाशवी सत्ता फार काळ टिकणार नाही. दुर्दैवाने, ही राजवट संपेपर्यंत अफगाणिस्तानच्या जनतेला त्याची किंमत चुकवावी लागेल.

Tweet:

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थितीबद्दल संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. त्याच वेळी, 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत चाललेल्या संपूर्ण बचाव कार्यात सुमारे दीड लाख लोकांना देशाबाहेर काढण्यात आले. सध्या भारतासह बहुतांश देशांचे दूतावास अफगाणिस्तानातून गेले आहेत. अफगाणिस्तानवर तालिबानच्या ताब्यानंतर, लोक तालिबानच्या निरंकुश आणि अराजक राजवटीला सर्वाधिक घाबरतात. तालिबान पुन्हा एकदा देशात शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती लोकांना वाटत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif