Matthew Perry (Photo Credits: X)

लोकप्रिय अमेरिकन सीट कॉम 'Friends' मधील स्टार कलाकार Matthew Perry, च्या निधनामध्ये बेकायदेशीरपणे Ketamine पुरवल्याबद्दल दोषी ठरवण्यास डॉक्टर Salvador Plasencia यांनी सहमती दर्शवली आहे. करारानुसार, डॉक्टर Plasencia केटामाइन देण्याच्या चार गुन्ह्यांसाठी दोषी ठरतील. करारानुसार, त्याला जास्तीत जास्त 40 वर्षे तुरुंगवास, तीन वर्षे देखरेखीखाली सुटका आणि किमान 20 लाख डॉलर्स दंडाची शिक्षा होऊ शकते. येत्या आठवड्यात Plasencia न्यायालयात याचिका दाखल करण्याची अपेक्षा आहे.

अभिनेता Matthew Perry चं निधन 28 ऑक्टोबर 2023 रोजी निधन होण्यापूर्वी, 54 वर्षीय Perry हा depression आणि anxiety वर उपचार घेत होता. तो केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होते. परंतु federal prosecutors नी सांगितले की त्याने देखरेखीशिवाय डोस मागितले आणि घेतले होते - आणि त्यामुळे औषधावर "out of control" अवलंबित्व निर्माण झाले होते.

Prosecutors च्या माहितीनुसार, डॉक्टर Plasencia आणि इतरांनी त्याला विकलेल्या सुमारे एका महिन्यात पेरीने दररोज केटामाइनच्या सहा ते आठ इंजेक्शनसाठी $55,000 दिले. आरोपपत्रात समाविष्ट केलेल्या एका मेसेज मध्ये डॉक्टर Salvador Plasencia आणि या योजनेत दोषी ठरलेले दुसरे डॉक्टर Mark Chavez हे पेरीवर किती शुल्क आकारावे याबद्दल चर्चा करताना आढळले आहेत.

Ketamine काय आहे?

Ketamine हे भूल देण्यासारखं औषध आहे. ज्यामध्ये भ्रामक गुणधर्म (hallucinogenic properties) आहेत. हे औषध  नैराश्य, चिंता यामध्ये वापरलं जातं. recreational users कडून त्याचा चूकीचा किंवा अतिवापर देखील केला जातो.

न्यायालयीन कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की Plasencia ने सप्टेंबरच्या अखेरीस ते ऑक्टोबर 2023 च्या मध्यापर्यंत पेरीला केटामाइनच्या 20 बॉटल्स, lozenges चे पॅकेज आणि सिरिंज पुरवले होते. सहाय्यकाला कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नाही हे माहित असूनही, त्याने पेरीच्या सहाय्यकाकडे औषधे दिल्याचा आरोप Prosecutors नी केला आहे.