Indian-Origin Man Shot Dead In US: रोड रेड प्रकरणात भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

एका नवविवाहित पुरुषाची हत्या केली. हत्या झालेला पुरुष हा भारतीय वंशाचा होता. गेविन दसौर २९ असं मृताचे नाव होते.

USA PC TW

Indian-Origin Man Shot Dead In US: अमेरिकेच्या इंडियाना राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहित पुरुषाची हत्या केली. हत्या झालेला पुरुष हा भारतीय वंशाचा होता. गेविन दसौर २९ असं मृताचे नाव होते. गेविन मेक्सिकन पत्नीसोबत घरी परतत असताना ही घटना घडली. ही घटना इंडियाना पोलिस या शहरात घडली. गेविन यांचे 29 जून रोजी विवियाना झामोरीशी लग्न झाले होते. (हेही वाचा-रील बनवताना 11 वर्षांच्या मुलाचा फास लागून मृत्यू; मध्य प्रदेशातील मुरैना येथील घटना (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, गेविन दसौरचा पिकअप ट्रकच्या चालकाशी वाद झाला आणि वादात रागाच्या भरात त्याला गोळी मारण्यात आली. गोळीबारानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गोळीबारात त्याचा अधिक रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गोळीबाराचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गेविन आणि चालक यांच्यामध्ये वाद झाला होता. गेविनच्या हातात बंदूक होती. या प्रकरणी पोलिसांनी म्हटले आहे की, पिकअप ट्रक चालकाने स्वत: चे रक्षण करण्यासाठी कृत्य केले असावे. शहर पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीच्या मृत्यूनंतर झामोरी हीनं माध्यमांशी संवाद साधला आणि सांगितले की, या घटनेनंतर कुटुंबाना मोठा धक्का बसला आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif