Russia's 75th Victory Day Parade Anniversary: मॉस्को मध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही सेनांच्या एका तुकडीचा ऐतिहासिक विक्ट्री परेड मध्ये सहभाग; पहा हा शानदार क्षण (Watch Video)
याचं औचित्य साधत यंदा मॉस्को मध्ये रेड स्क्वेअर (Red Square) येथे भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं आहे.
दुसर्या विश्वयुद्धामध्ये (World War II) रशियाने मिळवलेल्या विजयाची यंदा 75 वी विश्वपूर्ती आहे. याचं औचित्य साधत यंदा मॉस्को मध्ये रेड स्क्वेअर (Red Square) येथे भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय जवानांसह जगभरातील इतर देशांच्या सैन्यांनीदेखील परेडमध्ये सहभाग घेत शिस्तबद्ध संचलन केले आहे. यंदा कोरोना संकटकाळातही पुरेशी खबरदारी घेत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील उपस्थिती लावली आहे.
भारताकडून विजय परेडमध्ये सहभागी तुकडीचं नेतृत्त्व वीर सिख लाईट इंफेट्री रेजिमेंट मधील बड्या अधिकार्याद्वारा केले जात आहे. या रेजिमेंटचा दुसर्या विश्वयुद्धात सहभाग होता. या रेजिमेंटने वीरता, साहसाने लढाई लढली होती. त्यांना त्यांच्या साहसासाठी रेजिमेंट अधिकार्यांना वीरता पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दरम्यान यामध्ये चार बॅटलहॉर्न, दोन मिलिट्री क्रॉस पुरस्कारांचा समावेश आहे.
ANI Tweet
राजनाथ सिंह यांची उपस्थिती
का केलं जातं आयोजन?
रशियाचे नेता जोसेफ स्टॅलिन यांनी 22 जून 1945 साली असा आदेश काढला होता की जर्मनच्या नाझी सेनेविरूद्ध जिंकल्यांच्या आनंदामधे मॉस्कोच्या रेड स्क्वेअर वर त्याचा आनंदोत्सव साजरा केला जाईल. पूर्वी का सोहळा वर्षातून क्वचित प्रसंगी साजरा केला जात होता. मात्र आता हा सोहळा 1995 नंतर दरवर्षी साजरा केला जातो. दरम्यान 1945 नंतर यंदा दुसर्यांदा मे महिन्याच्या नंतर हा सोहळा आयोजित करण्यात आला.