Shocking! बाळाचे रडणे थांबावे म्हणून आईने 7 आठवड्यांच्या बाळाला दुधाऐवजी पाजली दारू; महिलेला अटक
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, महिला कार चालवत होती आणि तिचे दीड महिन्याचे बाळ सतत रडत होते. मूल गप्प बसत नव्हते. त्यानंतर मुलाला शांत करण्यासाठी तिने या बाळाला दारू पाजली. त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली. नंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या बाळावर उपचार सुरू आहेत.
Shocking: असं म्हणतात की, आपल्यावर आईपेक्षा जास्त प्रेम कोणीही करू शकत नाही. प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाचा सामना करते. या जगात आई सर्वोत्कृष्ट आहे. पण अमेरिकेतून असा एक प्रकार समोर आला आहे, जो ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल की ही कोणती आई आहे जी स्वतःच्या मुलाच्या भल्याचा विचार करू शकत नाही. आई आपल्या मुलासोबत असं कसं करू शकते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका 37 वर्षीय महिलेने आपल्या दीड महिन्याच्या बाळाला दुधाच्या बाटलीतून शांत करण्यासाठी दारू पाजली.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, महिला कार चालवत होती आणि तिचे दीड महिन्याचे बाळ सतत रडत होते. मूल गप्प बसत नव्हते. त्यानंतर मुलाला शांत करण्यासाठी तिने या बाळाला दारू पाजली. त्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली. नंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या बाळावर उपचार सुरू आहेत. सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा आईला तत्काळ तुरुंगात टाकले पाहिजे, अशी संतापजनक प्रतिक्रियाही एका यूजरने दिली आहे. (हेही वाचा - Human Pyramid on Bike in Uttar Pradesh: एका दुचाकीवर बसले चक्क सात तरुण; रील बनवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास, व्हिडिओ व्हायरल (Watch))
दुसर्या एका युजर्सने म्हटलं आहे की, एक आई आपल्या मुलासोबत असे कसे करू शकते यावर विश्वासच बसत नाही. अनेक युजर्संनी या महिलेवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहे. या घटनेनंतर आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा - Lamborghini कारच्या धडकेत कुत्रा ठार, पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील घटना (Watch Video))
प्राप्त माहितीनुसार, ओनेस्टी दे ला टोरे असे या महिलेचे नाव आहे. सॅन बर्नार्डिनो काउंटी शेरीफच्या म्हणण्यानुसार, महिलेला 60,000 डॉलरच्या बाँडवर वेस्ट व्हॅली डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर नेटीझन्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

