Bomb Blast In Balochistan: पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट; 20 जण ठार
या घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील रेल्वे स्थानकाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच हा स्फोट झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. स्फोटाच्या वेळी स्थानकावरील गर्दी सामान्य होती.
Bomb Blast In Balochistan: पाकिस्तानच्या अशांत प्रांत बलुचिस्तान (Balochistan) मध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथील रेल्वे स्थानकाजवळ हा बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला. रेल्वे स्टेशनच्या बुकिंग ऑफिसमध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच हा स्फोट झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. स्फोटाच्या वेळी स्थानकावरील गर्दी सामान्य होती.
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले. क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि पॅरामेडिक्सला पाचारण करण्यात आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्फोट झाला तेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली नव्हती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Pakistan:पाकिस्तानच्या वझिरीस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 मुले, 4 पोलीस ठार)
पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, पहा व्हिडिओ -
21 killed and over 30 injured in a bomb blast at #Quetta Railway Station in #Balochistan. Baloch Liberation Army claims responsibility for the attack on Pakistan Army’s unit pic.twitter.com/v9Sn5F5vxt
— Bahot | باہوٹ (@bahot_baluch) November 9, 2024
कार्यवाहक राष्ट्रपती सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या प्राणघातक घटनेचा निषेध करत म्हटले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत जे निष्पाप लोकांना लक्ष्य करतात. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा गिलानी यांनी पुनरुच्चार केला. दरम्यान, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जीवघेण्या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

