Indian Student Dies in US: आंध्र प्रदेशातील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू

लोगान काउंटीमधील हायवे 74 जवळ झालेल्या अपघातात हरिकाचा मृत्यू झाला.

Accident PC PIXABAY

Indian Student Dies in US: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) तेनाली (Tenali) येथील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनी (Veterinary Student) चा शनिवारी, 20 जुलै रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू झाला. जेट्टी हरिका असं या विद्यार्थिनीचं नाव होतं. हरिका, दीड वर्षापूर्वी व्हेटर्नरी मेडिसिनच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी यूएसला गेली होती. लोगान काउंटीमधील हायवे 74 जवळ झालेल्या अपघातात हरिकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, ओएचपीने सांगितले की, खराब हवामानामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या अपघाताच्या बातमीने अमेरिका आणि आंध्र प्रदेश या दोन्ही देशातील तेलगू समुदायावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा -Indian-Origin Man Shot Dead In US: रोड रेड प्रकरणात भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या, घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

हरिकाचे कुटुंबीय आणि मित्र अंतिम संस्कारासाठी तिचा मृतदेह तेनाली येथे आणण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहेत. तिचे वडील श्रीनिवास राव, आणि आई नागमणी यांच्यासह हरिकाचे कुटुंबीय तिच्या मृतदेहाच्या परतीसाठी भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. (हेही वाचा -Boy Shoots Himself With Father's Gun: अमेरिकेतील लुझियानामध्ये 3 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या बंदुकीने झाडली स्वतःवर गोळी; घटनेचा तपास सुरू)

हरिकाच्या नातेवाईकाने सांगितले, या अचानक झालेल्या घटनेमुळे आम्ही पूर्णपणे दु:खी झालो आहोत. आत्ता आमचे प्राधान्य हरिकाला घरी पोहोचवणे आणि अंतिम संस्कार करणे हे आहे. या कठीण काळात आम्ही सरकारला साथ आणि सहकार्याची विनंती करतो.