China Earthquake: चीन मध्ये 6.2 रिश्टल स्केलचा भूकंप; 111 जणांचा मृत्यू
यात 111 जणांचा मृत्यू तर 230 पेक्षा अधिक जखमी आहेत.
चीन (China) मध्ये सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. 6.2 रिश्टल स्केलच्या भूकंपामध्ये (Earthquake) 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा देखील मोठा आहे. चीनच्या Gansu आणि Qinghai provinces मध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. Xinhua News Agency च्या माहितीनुसार, 86 जण Gansu आणि अन्य 9 जणं Qinghai मध्ये मृत्यूमुखी पावले आहेत.
चीन मध्ये सध्या भूकंपाग्रस्त भागात शोध आणि बचावकार्य सुरू आहे. यामध्ये मनुष्यहानी सोबतच वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये घरं आणि रस्त्यांचे नुकसान झालं आहे. सध्या चीन मधील भीषण अवस्थेचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडीया मध्ये वायरल होत आहेत. Earthquake In Afghanistan: अपगाणिस्तानात जाणवले 5.2 तीव्रतेचा भुकंप, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली माहिती .
पहा ट्वीट
चीन मध्ये भूकंप मागील काही महिन्यातही झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात 5.4 मॅग्निट्युटचा भूकंप चीनच्या पूर्व भागामध्ये झाला होता.23 जणांनी यामध्ये जीव गमावला होता तर डझनभर इमारती कोसळल्या होत्या.