काय सांगता? 5 वर्षांच्या मुलीने आईला न माहिती होता Amazon वरून मागवली 2.47 लाख रुपयांची खेळणी व बूट; जाणून घ्या काय घडले पुढे

लीलाची आई, जेसिका नुनेस यांनी NBC 10 न्यूजला सांगितले, ‘मी माझ्या Amazon ऑर्डरची हिस्टरी चेक केली तेव्हा दिसून आले की, कोणीतरी 10 मोटारसायकल, एक जीप आणि 10 जोड्यांचा काउगर्ल बूट ऑर्डर दिली आहे.'

Amazon (PC - Pixabay)

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) जशी सुविधा आहे तशीच ती एक समस्याही आहे, विशेषतः जर तुमच्या घरी लहान मुले असतील. अनेकदा आपला मोबाईल मुलांच्या हातात असतो आणि त्याद्वारे ते आपल्याला न माहिती होता कधीही काहीही ऑर्डर करू शकतात. विश्वास बसत नसेल तर ही बातमी वाचा. अवघ्या 5 वर्षांच्या मुलीने आईला न माहिती होता एका झटक्यात Amazon वरून 2.47 लाख रुपयांची खेळणी आणि शूज ऑर्डर केले आहेत. यातील बरेचसे सामान घरापर्यंतही पोहोचले होते.

हे प्रकरण अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्सचे आहे. इथे पाच वर्षांची लीला बॅरिस्को आपल्या आईच्या फोनसोबत खेळत होती. त्यावेळी तिने तिच्या आईच्या Amazon खात्यातून $3,000 किमतीच्या वस्तूंची ऑर्डर दिली. यात 10 मोटारसायकल आणि 10 जोडे काउगर्ल बुटांचा समावेश होता.

लीलाची आई, जेसिका नुनेस यांनी NBC 10 न्यूजला सांगितले, ‘मी माझ्या Amazon ऑर्डरची हिस्टरी चेक केली तेव्हा दिसून आले की, कोणीतरी 10 मोटारसायकल, एक जीप आणि 10 जोड्यांचा काउगर्ल बूट ऑर्डर दिली आहे. यातील काउगर्ल बूट माझ्या साईझचे ऑर्डर केले होते. बाईक आणि जीपची किंमत सुमारे $3,180 होती, बूटाची किंमत सुमारे $600 आहे.’ जेसिकाने पुढे सांगितले की, Amazon अॅपवर उत्पादन निवडल्यानंतर लीलाने ‘Buy Now’ वर क्लिक केले. (हेही वाचा: Saeed Rashed AlMheiri अवघ्या 4 वर्षांच्या मुलाच्या नावावर Youngest Person to Publish a book (male)चा Guinness World Records)

जेसिका म्हणाली की तिने, शूज आणि मोटारसायकलच्या अर्ध्या ऑर्डर ताबडतोब रद्द केल्या, परंतु पाच मोटारसायकल आणि जीपची ऑर्डर ती थांबवू शकली नाही. ही उत्पादने डिलिव्हरीसाठी निघाली होती. यातील मोटारसायकल परत करण्यायोग्य नव्हत्या. जेव्हा लीलाला विचारण्यात आले की, तिने हे कसे केले, त्यावेळी तिने सांगितले की ती फक्त एक बटन अनेकवेळा दाबत राहिली. या ऑर्डर्स थांबवण्यासाठी जेसिकाचा नवरा पहाटे 2 वाजता आउटलेटवर पोहोचला पण त्यातील काही ऑर्डर्स आधीच डिलिव्हरीसाठी निघाल्या होत्या.