Kenya Cult Deaths: केनियात अंधश्रद्धेपोटी 39 लोकांनी गमावला जीव, पाद्रीच्या जमीनीतून खोदून काढल्या 39 मृतदेह

अनुयायांनी सांगितले की ते येशूला भेटण्यासाठी पाद्रीच्या सूचनेनुसार उपाशी आहेत.

Kenya Cult Deaths: केनियात अंधश्रद्धेपोटी 39 लोकांनी गमावला जीव, पाद्रीच्या जमीनीतून खोदून काढल्या 39 मृतदेह
Kenya Cult Death

केनियामध्ये (Kenya ) एका पाद्रीच्या जमीनीतून आतापर्यंत 39 लोकांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनूसार पाद्रीने (Pastor) आपल्या अनुयायांना जेवणाचा त्याग करण्यास सांगत असे, असे केल्यास प्रभू येशू आपल्याला भेटतील असे हा पाद्री आपल्या अनुयायांना सांगत असे. उपाशीपोटी असल्यामुळे अनुयायांचा मृत्यू झाला. काही तक्रारीनुसार पोलिसांनी मालिंदी येथील पाद्रीच्या मालमत्तेवर छापा टाकला, जिथे त्यांना 15 क्षीण लोक सापडले, ज्यात नंतर मरण पावलेल्या चार जणांचा समावेश आहे. अनुयायांनी सांगितले की ते येशूला भेटण्यासाठी पाद्रीच्या सूचनेनुसार उपाशी आहेत.

पोलिस कोठडीत असताना माकेन्झी हे गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यापुर्वी 2019 मध्ये आणि या वर्षाच्या मार्चमध्ये मुलांच्या मृत्यूप्रकरणी पाद्रीला दोनदा अटक करण्यात आली, परंतू प्रत्येक वेळी त्याला बाँडवर सोडण्यात आले.

स्थानिक राजकारण्यांनी कोर्टाला विनंती केली आहे की त्याला यावेळी सोडू नका, जेणेकरून मालिंदी परिसरातील पंथांचा प्रसार कमी होईल. तसेच सध्या पोलीस पाद्रीच्या घराचा परिसर हा खोदत असून अजून शव मिळण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).