Uber Ride: अबब! उबेर कॅबच्या 15 मिनिटांच्या राईडवर आकारलं तब्बल 32 लाख रुपये भाडं
32 लाख रुपये भाडं देवून या तरुणाने फक्त साडे साह किलोमिटरचा प्रवास केल्याची माहिती या तरुणाने दिली आहे. नेमका हा प्रकार घडली कसा, तो कुठुने कुठे प्रवास करत होता या तरुणाचं नाव काय जाणून घेवूया.
तुम्ही तुमच्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॅबचा (Cab) वापर करता का? हो तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण कुठेही जायचं असल्यासं अगदी मिनिटांत कॅब बूक (Cab Book) करुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमीचं जात असाल. काही अंतरावरच्या किंवा शहरातला शहरात प्रवास करायचा असल्यास हा अगदी सोयिस्कर पर्याय आहे. किमीत कमी शे-दोनशे किंवा जास्तीत जास्त हजार दोन हजार तुम्ही या प्रवासासाठी मोजले असाल. पण उबर राईडच्या (Uber Ride) एका प्रवाशासोबत असं काही घडलं की त्याल्या चक्क 15 मिनीटं प्रवासाचे तब्बल 32 लाख रुपये भरावे लागले आहे. 32 लाख रुपये भाडं देवून या तरुणाने फक्त साडे साह किलोमिटरचा प्रवास (Travel) केल्याची माहिती या तरुणाने दिली आहे. नेमका हा प्रकार घडली कसा, तो कुठुने कुठे प्रवास करत होता या तरुणाचं नाव काय जाणून घेवूया.
ऑलिव्हर कॅप्लान (Oliver Kaplan) असं या तरुणाचं नाव असुन तो 22 वर्षांचा आहे. ग्रेटर मँचेस्टर (Greater Manchester) येथे इंग्लंडमधील (England) हायड ते अॅश्टन-अंडर-लाइन या उबेर प्रवासासाठी त्याने तब्बल 32 लाख रुपये भाडं भरलं आहे. तरी ऑलिव्हर हा रोजच रात्री कामावरून घरी जाताना उबेर कॅबचा (Uber Cab) वापर करतो. काल रात्री ऑलिव्हर मित्राकडे पार्टीवरुन परत येत असताना नेहमी प्रमाणे त्याने उबर कॅब बुक केली असता ड्रायव्हर (Driver) आला आणि प्रवास सुरु झाला. उबेर कॅबने अगदीच 15 मिनीटांत इष्टस्थानावर (Destination) पोहचवले आणि ऑलिव्हरच्या डेबिट कार्डवर राईडचे शुल्क आकारले गेले. (हे ही वाचा:- Fight Between Young Women in Cafe: कॅफेमध्ये तरुणींमध्ये जोरदार हाणामारी; Watch Viral Video)
पण ऑलिव्हर सकाळी उठला आणि बघतो तर काय उबर राईडेचे जवळपास 32 लाख रुपये भाडे त्याच्या बॅंक अकाउंटवरुन कट करण्यात आले होते. संबंधित प्रकाराबाबत उबर कस्टमर केअरशी (Uber Customer Care) संपर्क साधला असता घडलेल्या प्रकाराची पुष्टी केली आणि काही धक्कादायक माहिती पुढे आली. ऑलिव्हरकडून इतके जास्त शुल्क आकारण्यात आले कारण कसे तरी ट्रिपसाठी ड्रॉप-ऑफ स्थान अॅश्टन-अंडर-लाइन नावाच्या दुसर्या ठिकाणी सेट केले गेले होते जे ऑस्ट्रेलियातील (Australia) अॅडलेडजवळ आहे. लंडन ते अॅडलेड हे अंतर सुमारे 16000 किमी असल्याने 32 लाख रुपये भाडे आकारण्यात आल्याची माहिती उबर कडून देण्यात आली. तरी घडलेल्या प्रकाराबाबत उबरकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)