200 Kg Weight Loss: ट्रान्सफॉरमेश बघून बसेल आश्चर्याचा धक्का! तरुणीने कमी केलं तब्बल २०० किलो वजन

क्रिस्टीनाने २०० किलोहून अधिक वजन कमी करत आज क्रिस्टीनाचं वजन फक्त ८३ किलो हे आणि ती या वजनात अजून घट करण्याचा प्रयत्न करत आहे.

Pic Credit:- Christina Phillips- Facebook

वेट गेन करणं मोठी कमाल नाही पण वाढलेलं वेट कमी करणं म्हणजे मोठं आव्हान. हल्ली १० पैकी ७ व्यक्तीचे वजन अतिरिक्त वाढलेले दिसते. किंबहुना ते कमी करण्यासाठी विविध लोक अनेक नुस्के आजमावतात. पण वजन काही कमी होईना. कुणाला ५ कुणाला १० तर कुणाला वीस किलो कमी कराण्याचं लक्ष असतं. त्यासाठी मोठी मेहनत आणि उत्तम आहार हे फिगर मेंटेनन्सचं सिक्रेट आहे. पण तब्बल २०० किलो वजन कमी केल्चं तुम्ही ऐकलं आहात का? किंबहुना कुणाचं वजन २०० किलो असणं हेचं मोठं दुर्मिळ उदाहरण पण त्यात दोनशे किलो वजन कमी करणार कुणी असणं म्हणजे अशक्यचं. एका तरुणीनचं वजन ३१७ किलो होतं किंबहुना ती जगातील सर्वाधिक लठ्ठ व्यक्तींपैकी एक आहे. क्रिस्टीना फिलीप्स या तरुणीचं नावं असुन हिने २०० किलो वजन कमी करत जगापुढे एक अनोख प्रदर्शन केलं आहे.

 

अगदी २० वर्षांच्या वयात क्रिस्टेनाचं वजन २८२ किलो होत. तेव्हा तिच्यावर एक सर्जरी करण्यात आली. दरम्यान डॉक्टरांनी तेला लवकरात लवकर वजन कमी करण्यास सांगितल, अथवा तिला नको ते शारिरीक आजार जडण्याची भिती आहे असं डॉक्टरांनी सांगतलं. दिवसेंदिवस क्रिस्टीनाची शारिरीक आणि मानसिक प्रकृती खालवचं होती. तिला तिच्या आई आणि पतीने दिलेल्या चुकीच्या हार पध्दतीमुळे तिला ही ओव्हर वेटची समस्या भेडसावत होती असे क्रिस्टीनाने सांगितले. तरी डॉक्टरच्या सल्ल्या नंतर क्रिस्टीनाने  वजन कमी करण्याचा निर्धार केला. (हे ही वाचा:- Cinnamon for Weight Loss: दालचिनीच्या चमत्कारी गुणधर्मामुळे काही दिवसात कमी होईल शरीराची चरबी; फक्त दैनंदिन जीवनात 'असा' करा वापर)

 

क्रिस्टीनाने २०० किलोहून अधिक वजन कमी करत आज क्रिस्टीनाचं वजन फक्त ८३ किलो हे आणि ती या वजनात अजून घट करण्याचा प्रयत्न करत आहे. ती यांसाठी मोठी मेहनत घेत आहे. जगातिल सर्वाधिक वेट असणारी तरुणी आता सुंदर आणि निरोगी झाली आहे. डॉक्टरसह जगभरातून क्रिस्टीनाच्या जिद्दी चिकाटीचं मोठ कौतुक केल्य़ा जात आहे.