अमेरिकेत 2 विमानांची हवेतच झाली टक्कर, 5 जणांचा मृत्यू
अमेरिकेतील अलास्का (Alaska) शहरात हवेमध्येच 2 विमानांची टक्कर होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे
अमेरिकेतील अलास्का (Alaska) शहरात हवेमध्येच 2 विमानांची टक्कर होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अलास्कातील केटचिकान ह्या शहरात हा अपघात झाला. ह्यात 10 जण गंभीर जखमी झाले असून 3 जण बेपत्ता आहेत. त्यातील एका विमानात 11 प्रवासी आणि क्रू सदस्य असून दुस-यामध्ये 5 प्रवासी होते. ही दोन्ही विमाने पाण्यावर उडणारी होती.
ही टक्कर नेमकी कशामुळे ह्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरु आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या साहाय्याने बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येतोय. तसेच जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
तेलंगाना: रंगारेड्डी जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी खासगी विमान कोसळले; पायलट सुरक्षित
ह्या भीषण अपघातानंतर ताक्वान एअर (Taquan Air)ने आपल्या पुढील फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. तसेच ह्या अपघाताचे स्वरुप लक्षात घेता संपूर्ण राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा बोर्डाला (NTSB)लागेल ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण घटनेचा अधिक तपास करण्यासाठी NTSB कडून 'Go Team'अशी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.