सुदान: राजधानी खार्तुम येथील सलुमी परिसरातील कारखान्यात स्फोट; 18 भारतीय कामगार ठार, 7 जखमी, 16 बेपत्ता
जयशंकर यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, या स्फोटामुळे 130 लोक जखमी झाले आहेत. उपचार करण्यासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर तर काहींची चिंताजनक आहे.
सुदान (Sudan) देशाची राजधानी खार्तुम (Khartoum) येथील सलुमी (Saloomi) परिसरात असलेल्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटात (Factory Explosion) 23 लोक ठाकर झाले आहेत. यात 18 भारतीय कामगारांचा समावेश आहे. सिलिंडर स्फोट झाल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, या स्फोटामुळे 130 लोक जखमी झाले आहेत. उपचार करण्यासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर तर काहींची चिंताजनक आहे. स्फोट झालेल्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
सलुमी येथील कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर सुदानच्या दुतावासानेही एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्फोटाची माहिती दिली आहे. दरम्यान, सुदानच्या दुतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण कामगरांमध्ये 7 भारतीय कामगारांचा समावेश आहे. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ट्विट
दरम्यान, या कारखान्यात काम करत असलेले काही कामगारांचे प्राण वाचले असून, ते सुरक्षीत आहे. त्यात 34 भारतीय कामगारांचा समावेश आहे. सुरक्षीत असलेल्या भारतीय कामगारांना सलुमी सिरामिक फॅक्ट्री रेसिडेन्समध्ये ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला दावा करण्यात येतो आहे की, स्फोटाची घटना घडल्यानंतर अद्यापही 16 भारतीय कामगार बेपत्ता आहेत. (हेही वाचा, तारापूरमधील कारखान्यात भीषण स्फोट, 4 जण गंभीर जखमी)
इंडिया इन सुदान ट्विट
भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदानची राजधानी खार्तुम येथील सलुमी परिसरातील कारखान्यात स्फोट झाला आहे. त्यात काही भारतीय कामगार ठार झाले. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर काही सुरक्षीत आहेत. दरम्यान, सुदानमध्ये असलेल्या कामगारांची चौकशी करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी भारतीय दुतावासाचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुतावासाना 249-94921917471 हा अपत्कालीन क्रमांक जारी करण्यात आला आहे.