Dennis Maliq Barnes: 16 वर्षीय विद्यार्थ्याला मिळाला जगातील 170 महाविद्यालयात प्रवेश; 74 कोटींची शिष्यवृत्तीही मिळाली
याशिवाय त्याला 9 मिलियन डॉलरची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.
Dennis Maliq Barnes: हायस्कूल ते पदवीपर्यंतचा प्रवास सोपा नाही. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी खूप पैसे कमवावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘ड्रीम कॉलेज’मध्ये किंवा कॉलेजमध्येच प्रवेश मिळत नाही. दुसरीकडे, डेनिस मलिक बार्न्स (Dennis Maliq Barnes) नावाच्या विद्यार्थ्यांला अशी कोणतीही चिंता नाही. डेनिस बार्न्स नावाचा 16 वर्षीय विद्यार्थ्याला जगातील 170 महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याशिवाय त्याला 9 मिलियन डॉलरची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.
बार्न्सने ऑगस्ट 2022 मध्ये महाविद्यालयांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. तेव्हा जगातील अधिकाधिक महाविद्यालयांना अर्ज करण्याची योजना होती. त्याला कॉलेजेसमध्ये स्वीकृतीची चिंता नव्हती. सीएनएनला मुलाखत देताना त्याने सांगितले की, त्याने जवळपास 200 संस्थांमध्ये अर्ज केला आहे. (हेही वाचा -World's Oldest Wine: जगातील सर्वात जुनी वाइन; तब्बल 1650 वर्षांनंतरही पिण्यासाठी असू शकते सुरक्षित (See Photos))
डेनिस बार्न्सने सांगितले की, जसजसा मी अधिक महाविद्यालयांमध्ये अर्ज केला, जसजसा माझा नंबर वाढत गेला तसं-तशी मला आर्थिक मदत आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला. मला 170 कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर माझ्या शाळेच्या प्रशासकांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. कारण, जगभरातील 170 महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून मी नवा विक्रम केला होता.
बार्न्स 4.98 च्या GPA सह दोन वर्षे लवकर पदवीधर होत आहे. शाळा आणि बार्न्स या दोघांचे प्रतिनिधी क्लार्क कॅसल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बार्न्सच्या या कामगिरीचा शाळा प्रशासनाला अभिमान आहे आणि त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला आहे.