Turkiye-Syria Earthquake: देव तारी त्याला कोण मारी! तुर्कस्तानमध्ये भूकंपाच्या 128 तासांनंतर नवजात बालकाला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात आलं, Watch Video
हा निसर्गाचा चमत्कारच मानावा लागेल.
Turkiye-Syria Earthquake: तुर्कस्तान (Turkiye) आणि सीरिया (Syria) मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात (Earthquake) मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. त्याचवेळी आश्चर्यकारक आणि आनंदाची बातमीही समोर येत आहे. तुर्कस्तानच्या हेते प्रांतात घराच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले नवजात अर्भक तब्बल 128 तासांनंतर जिवंत सापडले. हा निसर्गाचा चमत्कारच मानावा लागेल.
या मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो ज्या व्यक्तीने त्याला आपल्या मांडीवर घेतले आहे त्याचे बोट चोखताना दिसत आहे.तत्पूर्वी, एनडीआरएफच्या टीमने तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्यात अडकलेल्या 8 वर्षांच्या मुलीची सुखरूप सुटका केली होती. (हेही वाचा - Turkey Earthquake: तुर्की आणि सीरियामधील मृतांचा आकडा 50 हजारांच्या वर जाऊ शकतो; संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केली भीती)
याआधी, तुर्कीमध्ये मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी, तुर्की लष्कराच्या जवानांसह गाझियानटेप प्रांतातील नूरदगी शहरात ऑपरेशन केले होते. एनडीआरएफच्या जवानांनी गुरुवारी या भागातून एका 6 वर्षीय मुलीची सुटका केली होती.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारत दोन्ही देशांना मदत करत आहे. भारताचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तुर्कस्तान आणि सीरियामध्ये बचाव कार्यात गुंतले आहेत.