South Korea: दक्षिण कोरियांमध्ये 1000 कुत्र्यांचा अत्याचारामुळे मृत्यू- रिपोर्ट
या प्रांतात चक्क 1,000 कुत्र्यांना अन्नपाण्याविना तडफडून मारण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणी एका 60 वर्षीय संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आसे आहे.
दक्षिण कोरीयातील एका प्रांतातून धक्कादायक वृत्त आले आहे. या प्रांतात चक्क 1,000 कुत्र्यांना अन्नपाण्याविना तडफडून मारण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणी एका 60 वर्षीय संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आसे आहे. द कोरिया हेराल्डने याबात दिलेल्या वृत्तात आरोपीने गुन्हा प्रथमदर्शनी कबूल केला असल्याचे म्हटले आहे. आरोपीवर मुक्या प्राण्यांना क्रुररित्या मारल्याचा आरोप आहे.
एका वेळी हजारो कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने प्राणी हक्क कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काही प्राणीमित्रांनी दावा केला आहे की, वय झाल्याने प्रजननक्षम नसलेल्या आणि व्यावसायिकदृष्ट्याही आकर्षक नसलेल्या कुत्र्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी कुत्रा पाळणाऱ्यांनी आरोपीला पैसै दिले होते. जेणेकरुन तो कुत्र्यांची काळजी घेऊ शकेल. साधारण सन 2020क पासून या व्यक्तीला प्रति कुत्रा 10,000 वॉन (भारतीय चलनात 622.29 रुपये) दिले गेले. आरोपीने सुरुवातीला कुत्र्यांची काळजी घेतली. मात्र, पुढे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,असे अॅनिमल केअरच्या प्रतिनिधीने केबल न्यूज चॅनेल एमबीएनला सांगितले.
दक्षिण कोरियामध्ये प्राणी संरक्षणाचे कठोर कायदे आहेत. एखादा व्यक्ती पाळीव प्राण्याला अन्नपाणी देण्यास अयशस्वी ठरला आणि त्यामुळे जर प्राणी मृत झाला तर सदर व्यक्तीस तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 30 दशलक्ष वोन पर्यंत दंड होऊ शकतो, असे कायद्याचे अभ्यासक सांगतात.