Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीच्या काही असा फुड कॉम्बिनेशन तयार करतात.

gulab jamun vada Recipe INSTA

Food Combination: सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीच्या काही असा  फुड कॉम्बिनेशन तयार करतात. गुलाबजामून आणि वडा असा कॉम्बिनेशन कधी खाल्लं आहे का? चक्क एका तरुणाने गुलाबजामून वडा तयार केला आहे.  एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात गुलाबजामून वडा बनवतात. अनेकांनी या व्हिडिओला कंमेट देखील केली आहे.वडापाव हा महाराष्ट्रात प्रसिध्द खाद्यपदार्थ आहे. बाजारात उलटा वडापाव देखील खायला मिळतो. उलटा वडापाव खाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. चला पाहूयात कसा बनवला गुलाबजामून वडा, (हेही वाचा- द्राक्ष खाल्ल्याने होतोय आजार, जाणून घ्या नेमकं कारण काय? (Watch Video)

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, गुलाब जामून वडा तयार करण्यासाठी बेसन मिक्स तयार केले आहे.त्यानंतर काही गुलाबजामून बेसन मिक्स मध्ये मिक्स केले आणि बेसनचे आवरान लावून त्याला तेलात तळले. तेलात तळून झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व्ह केले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी कंमेट केले. फुड कॉम्बिनेशनच्या नावाखाली अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात. हे प्रयोग काहींना आवडतात. तर काही फुड कॉम्बिनेशन हे लोकांना नापसंद पडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by @foodb_unk

इन्स्टाग्राम अंकाऊटवर एकाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.  व्हिडिओ पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याची चव कशी असणार असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. एका युजर्संनी याला गुलाबजामून भजी असा नाव दिले आहे. हा पदार्थ कुठं विकला जात आहे हे समोर आले नाही.