YouTube ने हटवले 10 लाखांहून अधिक व्हिडिओ, जाणून घ्या त्यामागील कारण

जेव्हापासून कोविड19 महारोगाची सुरुवात झाली होती. या सर्व व्हिडिओ मध्ये कोरोना संक्रमण संबंधित माहिती पसरवली जात होती.

युट्युब म्युझिक (Photo credits: Pixabay)

युट्यूबने (YouTube) आपल्या प्लॅटफॉर्म वरुन एक मिलियन पेक्षा अधिक व्हिडिओ हटवले आहेत. जेव्हापासून कोविड19 महारोगाची सुरुवात झाली होती. या सर्व व्हिडिओ मध्ये कोरोना संक्रमण संबंधित माहिती पसरवली जात होती. कंपनीचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी असे म्हटले आहे की, हे व्हिडिओ आमच्या नियमानुसार हटवण्यात आले आहेत.(Yahoo चा मोठा निर्णय; भारतामध्ये Yahoo News, Yahoo Cricket, MAKERS सह अनेक सेवा झाल्या बंद)

त्यांनी पुढे असे म्हटले की, फेब्रुवारी 2020 पासून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन कोरोना व्हायरस संबंधिक एक मिलियनहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. जे चुकीची माहिती देत होते. या व्हिडिओच्या माध्यमातून उपचाराबद्दल खोटी माहिती दिली जात होती. युट्यूबचे असे म्हणणे आहे की, चूकीची माहिती देणारे व्हिडिओ आम्ही हटवण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहोत. कंपनीने प्लॅटफॉर्मच्या प्रति महिन्यात जवळजवळ 10 मिलियन व्हिडिओ हटवले असून ते 10 पेक्षा कमी वेळा पाहिले आहे. चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवणे हे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्याने युजर्सला योग्य माहिती मिळणार आहे.

युट्यूबच्या मते, नोव्हेंबर 2020 मध्ये काही हजार व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन हटवले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिका निवडणूकीबद्दल चुकीची माहिती दिली जात होती. दरम्यान, जाहीरात हटवण्यासाठी युट्यूब सब्सक्रिप्शनचे पॅक सुद्धा तु्म्ही वापरु शकता. त्यानुसार तुम्हाला कोणतीही जाहीरात न दिसता व्हिडिओ पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला 129 रुपये प्रति महिना शुल्क भरावा लागणार आहे.(Amazon Prime युजर्स आपल्या प्रोफाइल पिक्चरवर ठेवू शकतात आपल्या आवडीचे कॅरेक्टर, जाणून घ्या अधिक)

युट्यूबने आपल्या युजर्ससाठी चॅप्टर फिचर घेऊन येण्याची तयारी करत आहे. या फिचरमध्ये आर्टिफिशियर इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग Algorithms तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. याच्या माध्यमातून चॅप्टर व्हिडिओ आपोआप जोडले जाणार आहे. सध्या क्रिएटर्सला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मॅन्युअली चॅप्टर जोडावे लागतात. कंपनीने कंन्फर्म केले आहे की, या फिचरची टेस्टिंग केली जात आहे. यामध्ये सर्वाधिक फायदा क्रिएटर्सला होणार आहे.