लॉन्चिंगपूर्वी Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या स्मार्टफोनच्या प्रत्येक अपडेट बद्दल अधिक

तत्पूर्वी या स्मार्टफोन संबंधित स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत.

रेडमी (Photo Credit: Xiaomi Global Website)

Xiaomi कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन Xiaomi Redmi 10 लवकरच लॉन्च केला जाणार आहे. तत्पूर्वी या स्मार्टफोन संबंधित स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. फोनचे स्पेसिफिकेशन शाओमीच्या अधिकृत ब्लॉगवर स्पॉट करण्यात आले आहेत. दरम्यान, स्पेसिफिकेशन लीक झाल्यानंतर ते डिलीट करण्यात आले आहे. मात्र आता उशीर झाला असून त्याबद्दल सर्वांना कळले आहे. फोनमध्ये देण्यात आलेल्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास ती 5000mAh ची असणार असून रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.(सावधान! POCO F3 GT खरेदी पूर्वी जाणून घ्या फोनसंबंधित 'या' महत्वाच्या गोष्टी)

रेडमी10 स्मार्टफोनमध्ये एक 6.5 इंचाचा LED पॅनल दिला आहे. त्याचा रेजॉल्यूशन 2400X1080 पिक्सल असणार आहे. फोनमध्ये AdaptiveSync रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. म्हणजेच युजर्सला आता आपल्या हिशोबाने 30Hz, 50Hz, 60Hz आणि 90Hz रिफ्रेश रेट सेलेक्ट करता येणार आहे. फोनमध्ये एक पंच होल डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. फोनच्या स्क्रिनला प्रोटेक्ट करण्यासाठी Corning Gorilla Glass 3 दिले आहेत. फोनची बॉडी पॉलिकॉर्बोनेट पासून तयार करण्यात आली आहे.

स्मार्टफोनमध्ये 161.95X8.92mm चे डायमेंन्श दिले आहे. तसेच फोनचे वजन 181 ग्रॅम असणार आहे. फोन तीन कलर ऑप्शन Carbon Gray, Pebble White आणि सी ब्लू मध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. फोनमध्ये एक MediaTek Helio G88 SoC चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. त्याचसोबत स्मार्टफोन ग्राहकांना 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सपोर्टसह येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 4G, WiFi, ब्लूटूथ 5.0, GNSS (GPS, A-GPS, GLONASS, GALILEO, BDS), यूएसबी टाइप-सी मिळणार आहे. त्याचसोबत 3.5mm हेडफोन जॅकचा सपोर्ट मिळणार आहे.(Exynos 850 Chipset सह Samsung Galaxy A12 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत)

Xiaomi Redmi 10 स्मार्टफोनमध्ये एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा असणार आहे. या व्यतिरिक्त एक 8MP अल्ट्रा वाइड लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेंसरचा सपोर्ट दिला जाणार आहे. सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉट दिला आहे. या व्यतिरिक्त ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स, साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. अद्याप कंपनीकडून स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल खुलासा करण्यात आलेला नाही.