Xiaomi कंपनीचा नवा आविष्कार! भारतात 14 जुलै ला लाँच करणार कार मध्ये हवा भरणारे Mi Portable Electric Air Compressor
याची युके मध्ये £39.99 इतकी किंमत आहे. तर भारतीय किंमतीनुसार याची किंमत 3,790 रुपये इतकी आहे.
बदलत्या तंत्रज्ञानानुसार होणारे बदल हे तंत्रयुगात क्रांती आणत आहेत. यामुळे कधी काय होईल याचा काही नेम नाही. यातच आता Xiaomi कंपनी लवकरच एक नवा आविष्कार भारतात आणणार आहे. ज्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही कार वा बाइकमध्ये हवा भरू शकतो. Mi Portable Electric Air Compressor च्या माध्यमातून हा चमत्कार घडणार आहे. येत्या 14 जुलै ला हे डिवाईस भारतात लाँच होणार आहे. शाओमी कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या संबंधीचा टीजर प्रदर्शित केला आहे. 23 सेकंदाच्या या टीजरमध्ये या प्रोडक्टबाबत माहिती दिली आहे.
हे प्रोडक्ट शाओमी ने चीन आणि युके मध्ये लाँच केले आहे. याची युके मध्ये £39.99 इतकी किंमत आहे. तर भारतीय किंमतीनुसार याची किंमत 3,790 रुपये इतकी आहे.
हेदेखील वाचा- Xiaomi चा 7 पॉप अप कॅमेरा लवकरच होणार लाँच; बाजारात येण्यापूर्वीच या स्मार्टफोनच फोटो झाले लीक
या डिवाईसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात डिजिटल प्रेशर सेंसिग डिस्प्ले, प्री-सेट प्रेशर कंट्रोल सिस्टम, कॉम्पेक्ट आणि ड्यूरेबल डिजाइनसह लाँच केला जाईल. हा पोर्टेबल डिवाईस एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी अगदी सहजगत्या नेता येईल. याचे डायमेंशन 124x71x45.3mm इतके आहे. हा टायर इलेक्ट्रिक इंफ्लेटर पंप Micro-USB चार्जिंग इंटरफेससह येतो. याचे इंफ्लेशन प्रेशरची रेंज 0.2-10.3bar/3-150psi आहे. हा डिवाईस बाइक, सायकल आणि कारच्या टायमध्ये हवा भरण्यासाठी कामी येईल.
इतकच काय तर या डिवाइसच्या माध्यमातून तुम्ही फुटबॉलमध्येही हवा भरू शकता. यात 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 3 तासांचा पूर्ण रिचार्ज देण्यात आला आहे.