Xiaomi फ्री देत आहे 100 जणांना Redmi Note 7 Pro, पण 'ही' आहे अट
Xiaomi ने नुकताच त्यांचा भारतात Redmi Note 7 सोबत Redmi Note 7 Pro लॉन्च केला आहे.
Xiaomi ने नुकताच त्यांचा भारतात Redmi Note 7 सोबत Redmi Note 7 Pro लॉन्च केला आहे. तर येत्या 18 मार्च रोजी हा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च करणास असल्याची शक्यता आहे. तसेच Redmi Note 7 Pro च्या इंडियन वेरियंटलाच चीन मध्ये लॉन्च करणार आहे.
तत्पूर्वी शाओमी कंपनीने रेडमी नोट 7 प्रो लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनीने एक अनोखी ऑफर काढली आहे. या ऑफर्समध्ये चीन मध्ये 100 या स्मार्टफोनच्या चाहत्यांना रेडमी नोट 7 प्रो गिफ्ट देणार आहे. परंतु ही ऑफर भारतीयांसाठी अद्याप लागू केलेली नाही.
या ऑफर्स अंतर्गत नोट 7 प्रो मोफत मिळवण्यासाठी या स्मार्टफोनच्या चाहत्यांना फक्त फोनमधील विविध फिचर्स पडताळून पाहायचे आहेत.(हेही वाचा-Xiaomi Black Shark 2 स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार धमाकेदार फिचर्ससह)
अशा पद्धतीने करा Apply:
चाहत्यांना त्यांच्या Mi अकाउंट लॉगिन करुन या कॉम्पिटेशनध्ये सहभगी व्हायचे असल्याचा मेसेज करायचा आहे. तसेच व्यक्तीने स्वत:ची सर्व वैयक्तिक माहिती द्यायची आहे. त्याचसोबत सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स असल्याची सुद्धा माहिती कंपनीला द्यायची आहे. तसेच रेडमी नोट प्रो 7 ची विक्री 13 मार्च पासून सुरु होणार आहे. ग्राहकांना फ्लिपकार्ट, एमआय ची वेबसाईट आणि एमआय स्टोर्समधून खरेदी करचा येणार आहे. भारतात या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे.